थंडीमुळे मुंबईकर गारठले, तापमानाचा पार 24 अंश सेल्सियसपेक्षा खाली उतरला
त्यात मुंबईत शुक्रवारी (8 फेब्रुवारी) पारा 24 अंश सेल्सियसच्या खाली गेल्याने मुंबईकर चांगलेच कुडकुडले आहेत.
Mumbai: उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांनी पुन्हा जोर धरला असल्याने त्याचा परिणाम विविध राज्यांमध्ये होत आहे. त्यात मुंबईत शुक्रवारी (8 फेब्रुवारी) पारा 24 अंश सेल्सियसच्या खाली गेल्याने मुंबईकर चांगलेच कुडकुडले आहेत. तर गेल्या दक्षकातील मुंबईत सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच कमाल 7 अंश सेल्सियसने पारा खाली उतरला आहे.
गेल्या आठवड्यात शहरातील तापमान 35 अंश सेल्सियस एवढे झाले होते. त्यामुळे थंडी जाऊन उन्हाळा सुरु होईल असे वाटत होते. मात्र कालपासून उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याने जोर धरल्याने मुंबईसह इतर राज्यात थंडीमुळे तापमान खाली गेले आहे. (हेही वाचा-राज्यात पुढील दोन दिवस हुडहुडी कायम राहणार)
तर थंडीतील मुंबईचे तापमान गेल्या दहा वर्षात फेब्रुवारी महिन्यात 26 अंश सेल्सियसने खाली आले होते. तर यंदा तापमान 24 अंशापेक्षा खाली उतरले आहे. त्यामुळे सकाळपासून ते रात्रीपर्यंत वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वातावरणात गारठा दिसून आला. तसेच मुंबईकर ही रस्त्यांवरुन जाताना स्वेटर, शाल किंवा कानटोपी घातलेले पाहायला मिळाले.