मुंबई: JEE, NEET 2020 च्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चालवल्या जाणार 46 विशेष लोकलच्या अधिक फेर्या
कोरोना लॉकडाऊनमध्ये प्रवासी वाहतूकीसाठी रेल्वे, मेट्रो समान्यांसाठी अजूनही बंद असल्याने केवळ जेईई मेन्स आणि नीट च्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
मुंबई सह देशभरात आजपासून कोरोनाच्या सावटाखाली अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणार्या जेईई मेन्स (JEE Mains) परीक्षांना सुरूवात झाली आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये प्रवासी वाहतूकीसाठी रेल्वे, मेट्रो समान्यांसाठी अजूनही बंद असल्याने केवळ जेईई मेन्स आणि नीट च्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये आता 46 अधिक स्पेशल ट्रेन्स चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे कडून घेण्यात आला आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवांंमधील नोकरदार मंडळी मुंबई लोकलने प्रवास करू शकतात.
देशभर 1-6 सप्टेंबर दरम्यान जेईई ची परीक्षा आहे तर 13 सप्टेंबर दिवशी नीट 2020 ची परीक्षा आहे. या परीक्षांच्या काळामध्ये अॅडमीट कार्डवर परीक्षार्थ्यासोबत पालकाला ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी रेल्वेचे तिकीट आकारले जाईल. मात्र अन्य सामान्य मुंबईकरांना ट्रेनमध्ये प्रवेश नसेल. JEE & NEET Exam 2020: जेईई व नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी Mumbai Local ने प्रवास करण्याची मुभा; अॅडमिट कार्डच्या आधारावर मिळेल प्रवेश.
ANI Tweet
ऐरोली, पनवेल, बदलापूर सारख्य टोकावर राहणार्या किंवा तेथील परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी आता जेईई आणि नीट परीक्षेचे विद्यार्थी मुंबई लोकलचा वापर करू शकणार आहेत. काल महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी परीक्षार्थ्यांना मुंबई लोकलचा वापर करण्यासाठी मुभा द्यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवण्यात आले होते. त्यानंतर रात्री उशिरा मुंबईकर विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाच्या परवानगीची घोषणा पियुष गोयल यांनी केली होती.