मुंबई: चर्चगेट स्टेशन जवळ होर्डिंग कोसळून मृत पावलेल्या मधुकर नार्वेकर यांच्या कुटुंबियांना पश्चिम रेल्वेची मदत
पश्चिम रेल्वेने या मृत व्यक्तीच्या कुटूंबीयांना 5 लाखाची मदत जाहीर केली आहे. अरबी समुद्रामध्ये वायू चक्रीवादळ घोंघावत असल्याने जोराने वारे वाहत आहेत.
चर्चगेट स्टेशन परिसरात आज (12 जून) होर्डिंग कोसळून मधुकर नार्वेकर या 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पश्चिम रेल्वेने या मृत व्यक्तीच्या कुटूंबीयांना 5 लाखाची मदत जाहीर केली आहे. अरबी समुद्रामध्ये वायू चक्रीवादळ घोंघावत असल्याने जोराने वारे वाहत आहेत. पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच आज मुंबईत अनेक ठिकाणी पडझडीचे वृत्त समोर आली आहे.
ANI Tweet
चर्चगेट पाठोपाठ वांद्रे येथील स्कायवॉकचा एक पत्र पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आली आहे. तर दोन अन्य महिला या दुर्घटनेमध्ये जखमी झाल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या डागडुजीमधील हलगर्जी पणा की नैसर्गिक आपत्तीमुळे नेमकी ही दुर्घटना घडली? हे अद्याप समजू शकले नसले तरीही पालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाकडून कमकूवत झाडांखाली गाड्या पार्क न करण्याचं, आडोशाला उभं न राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.