Mumbai Weather Forecast: मुंबईमध्ये मुसळधार पाऊस विश्रांतीवर, शहर आणि उपनगरांसाठी यलो अलर्ट; IMD कडून हवामान अंदाज जारी
मात्र, काही तलाव अद्यापही पाणीसाठ्याची किमान पातळी गाठू शकले नाहीत. त्यामुळे धरणक्षेत्रात पावसाची अद्यापही प्रतिक्षा असताना मुंबई शहरातील मुसळधार पाऊस विश्रांतीवर (Mumbai Rain Alert) गेला आहे. सलग तीन ते चार दिवस संततधार कोसळल्यानंतर पावसाने अचानक दडी मारली
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी काही तलाव (Mumbai Lakes) पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मात्र, काही तलाव अद्यापही पाणीसाठ्याची किमान पातळी गाठू शकले नाहीत. त्यामुळे धरणक्षेत्रात पावसाची अद्यापही प्रतिक्षा असताना मुंबई शहरातील मुसळधार पाऊस विश्रांतीवर (Mumbai Rain Alert) गेला आहे. सलग तीन ते चार दिवस संततधार कोसळल्यानंतर पावसाने अचानक दडी मारली. दरम्यान, पावसाची संततधार कमी (Mumbai Weather Update) झाली असली तरी, भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईत आज यलो अलर्ट जारी केला आहे. जरी इशारा गंभीर नसला तरी, रहिवाशांना त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचा आणि हवामान अंदाज (Mumbai Weather) पाहात अद्ययावत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईतील तापमान
आयएमडीने मुंबई शहरात हवामान अंदाज व्यक्त करतान यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, आज शहरातील तापमान खालील प्रमाणे असेल अशी नोंद आहे.
जास्तीत जास्त तापमान (जुलै 27): 29.7°C, सामान्य तापमानापेक्षा थोडे कमी 0.4°से.
सापेक्ष आर्द्रता (5:30 PM, 27 जुलै): 90%. (हेही वाचा, Shivneri Fort: शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळला; जुन्नर वनविभागाकडून पर्यटकांना सतर्कतेचा इशारा)
मुंबई साप्ताहिक हवामान अंदाज
28 जुलै: मुसळधार पावसासह ढगाळ वातावरण; 25.0°C आणि 30.0°C दरम्यान तापमान.
29 जुलै: मध्यम पाऊस; 26.0°C आणि 31.0°C दरम्यान तापमान.
30-31 जुलै: हलका पाऊस; तापमान कायम.
1-2 ऑगस्ट: पावसाचा अंदाज आहे; सुमारे 25.0°C ते 30.0°C पर्यंत तापमान. (हेही वाचा, Mumbai Sion Bridge: सायन पूल एक ऑगस्टपासून बंद होणार, 2026 मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार)
मुंबई तलावाची पातळी
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये एकूण पाणीसाठ्यात 24 तासांत 13,397 दशलक्ष लिटरने वाढ होऊन, सध्याचा साठा 10,41,322 दशलक्ष लिटर किंवा एकूण क्षमतेच्या 71.95% इतका झाला आहे. धरणांची नावे आणि जलस्थिती:
तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा: ओसंडून वाहत आहेत
अप्पर वैतरणा: 40.91% क्षमता
भतसा: 69.79% क्षमता
मध्य वैतरणा: 72.29% क्षमता
अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा हे तीन तलाव शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे प्राथमिक स्त्रोत आहेत. जे दररोज 2,977 दशलक्ष लिटर पुरवठा करतात. शनिवारी सकाळपर्यंत गेल्या 24 तासांत अप्पर वैतरणा धरणात 25 मिमी पावसाची नोंद झाली आहे. (हेही वाचा, Mumbai Rains: मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोडक सागर देखील पूर्ण क्षमतेने भरलं (Watch Video))
दरम्यान, मुंबईमध्ये सलग कोसळलेल्या संततधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. खास करुन रेल्वे लोकल आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे अनेक ठिकाणी ठप्प झाल्या तर काही ठिकाणी विलंबाने धावू लागल्या. रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्तेवाहतुकही मंदावली. दरम्यान, काही ठिकाणी जुन्या आणि जीर्ण इमारतींचे अवशेष कोसळण्याच्या घटना घडल्या.