Mumbai Weather Forecast on May 14: मुंबईत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

त्याशिवाय मुंबईत दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण पहायला मिळणार आहे.

Mumbai Rain

Mumbai Weather Forecast on May 14: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबई हवामान (Mumbai weather) मंगळवारी, 14 मे रोजी संध्याकाळी मेघगर्जनेसह हलका पाऊस (Light Rain)कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याशिवाय मुंबईत दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण पहायला मिळणार आहे. काल सोमवारी झालेले धुळीचे वादळ आणि पावसामुळे ठाणे, मुंबईसह आणि आजूबाजूच्या परिसरात तापमानात चांगलीच घट झाली आहे. उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे काही ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडली. सखल भागात पाणी साचले होते. पावसाचा वाहतूकीवरही परिणाम झाला होता. बहुतांश सर्वच ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.(हेही वाचा:Mumbai Rains: सांताक्रूझ परिसरात पावसाची जोरदार हजेरी; अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ (Watch Video))

आज हवामान अंदाज

भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 14 मे रोजी, “मुंबईत विजांच्या कडकडाटासह, हलका ते मध्यम पाऊस, 40-50 किमी ताशीवेगाने वारे वाहतील. त्याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण गोवा या भागातही पावसाच्या सरी कोसळतील”.

दरम्यान, मुंबईतील घाटकोपर येथील एका दुर्दैवी घटनेत, पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला, तर 74 जण जखमी झाले. दुसऱ्या घटनेत, बांधकाम सुरू असलेल्या निवासी संकुलाच्या पार्किंगचे मचान कोसळल्याने तीन जण जखमी झाले.