Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज

मुंबईत आज 18 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 28.54 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 26.99 °C आणि 29.21 °C दर्शवतो.

Mumbai Weather Prediction, August 19: मुंबईत आज 18 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 28.54 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 26.99 °C आणि 29.21 °C दर्शवतो. मुंबईत आज दिवसभर ढगाळ वतावरणस हलक्या सरींचा पाऊस अपेक्षित आहे भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या म्हणण्यानुसार, उद्या 19 ऑगस्टपासून मुंबईत काही भागात गडगडाटी वादळासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. जुलै अखेरीस झालेल्या मुसळधार पावसाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतली आहे. मुंबईसह उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसत आहेत. पाऊस ओसरल्यानं पुन्हा एकदा उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबई तसेच ठाणे, पालघर भागात हलक्या सरींचा अंदाज हवामान (IMD)विभागाने व्यक्त केला आहे.आयएमडी मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, गेल्या आठ दिवसांपासून पाऊस नसल्याने तापमान वाढले आहे. आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल यासाठी हवामान खात्याने मुंबईत उद्याचे हवामान कसे याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा पुनरागमन केले आहे. आज व पुढील काही दिवस राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या महितीनुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार आहे.कोकणातील सिंधुदुर्ग, खानदेशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now