Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबईच्या ताज्या हवामान अपडेटनुसार आज शुक्रवारी मुंबईत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने आपल्या ताज्या मुंबई हवामान अपडेटमध्ये, पुढील २४ तासांत "शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता असलेल्या अंशतः ढगाळ आकाश" राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Mumbai Weather Prediction, August 17: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबईच्या ताज्या हवामान अपडेटनुसार आज शुक्रवारी मुंबईत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने आपल्या ताज्या मुंबई हवामान अपडेटमध्ये, पुढील २४ तासांत "शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता असलेल्या अंशतः ढगाळ आकाश" राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.शहरातील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसवर स्थिरावण्याची शक्यता असून किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील.सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत बेट सिटीमध्ये 0.71 मिमी, पूर्व मुंबईत 0.39 मिमी आणि पश्चिम मुंबईत 1.46 मिमी पावसाची नोंद झाली आहे.पाऊस ओसरल्याने पुन्हा एकदा उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबई तसेच ठाणे, पालघर भागात हलक्या सरींचा अंदाज हवामान (Maharashtra Weather Update) विभागाने व्यक्त केला आहे. शहर परिसरात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही भागात पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाची दडी मारली आहे. काही भागात अधूनमधून पाऊस कोसळत आहेत.आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल यासाठी हवामान खात्याने मुंबईत उद्याचे हवामान कसे याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: Mumbai Weather Forecast: मुंबईत आज आभाळ ढगाळ, जाणून घ्या उद्याचे हवामान आणि AQI

राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने ओढ दिली आहे. जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर पाऊस होता. मात्र, ऑगस्ट महिन्यात पाऊस गायब झाला आहे. कोकणात व मध्य महाराष्ट्रात आज काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट व पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2024 03:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).