Mumbai Water Supply Update: मुसळधार पाऊस; जलमय मुंबईत पाणी पुरवठा खंडीत; भांडुप पंपिंग स्टेशन तुंबल्याने फटका
भांडुप पंपिंग स्टेशन मध्ये साचलेले पाणी उपसण्याचे काम सध्या जोरावर सुरु सुरु आहे. मुसळधार पावसामुळे पाणीपुरवठा खंडीत झाल्याने मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी पोहोचू शकले नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या घराबाहेर पाणी आहे मात्र घरातल्या नळाला पाणी नाही अशी स्थिती पाहायला मिळाली. मुंबई महापालिकेकडूनही नागरिकांना आजचा दिवस पाणी जपून वापरण्याचे अवाहन करण्यात येत आहे.
मुसळधार पावसाने रविवारी (18 जुलै) रात्री मुंबईत (Torrential Rains in Mumbai) कहर केला. मध्यरात्री 12 ते साधारण 3 वाजेपर्यंत संततधार कोसळलेल्या पावासाने सखल भागात मुंबईत पाणी साचले. त्यातच भांडूप पंपिंग स्टेशनमध्ये (Bhandup Pumping Station) मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्याचा फटका मुंबईच्या पाणी पुरवठ्यास बसला. त्यामुळे पाणी साचलेल्या मुंबईत मुंबईकरांना पाणी नाही अशी स्थिती निर्माण झाले. मुंबईत खंडीत झालेल्या पाणीपुरवठ्यावरुन (Mumbai Water Supply Update) सोशल मीडियावरुनही अनेकांनी महापालिकेला प्रश्न विचारले. दरम्यान, संपूर्ण मुंबई शहराला जो पाणीपुरवठा केला जातो त्या सर्व धरणांतील पाण्याचे शुद्धीकरण भांडूप संकुलात केले जाते. भांडूप संकुलात शुद्ध झालेले हेच पाणी पुढे मुंबईच्या घराघरात पोहोचते. मात्र, भांडूप येथील पंपिंग स्टेशनमध्येच पाणी तुंबल्याने पाणीपुरवठा काही काळ स्थगित करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई शहरात प्रतिदिन 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. (हेही वाचा, Mumbai Rains: मुंबईत 3 मोठ्या दुर्घटना; चेंबूर, विक्रोळी आणि भांडुप येथे भिंत कोसळून एकूण 15 जणांचा बळी)
कोणत्या ठिकाणी किती पाऊस?
मुंबई शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. विभागवार पावसाची नोंद पाहता सांताक्रूज - 217.5 मिमीस, कुलाबा - 178 मिमी,महालक्ष्मी - 154.5 मिमी, वांद्रे - 202 मिमी, जुहू विमानतळ - 197.5 मिमी, राम मंदिर - 171.5 मिमी, मीरा रोड - 204 मिमी, दहिसर - 149.5 मिमी, भायंदर - 174.5 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.
ट्विट
लेटेस्टलीचे पत्रकार अब्दुल कादीर शेख यांनी ट्विटरवरुन स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेला टॅग करत मुंबईतील खंडीत पाणीपुरवठ्याबाबत विचारले. यावर स्थानिक नगरसेवक हेतल गाला यांना माहिती देता सांगितले की, 'मुसळधार पावसामुळे तात्रिक कारणामुळे परिसरातील विजपुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे एच पश्चिम वॉर्ड आणि संपूर्ण मुंबईचाच पाणीपुरवठा काही काळासाठी खंडीत झाला आहे. समस्या निवारणासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच उपाययोजना करुन पाणीपुरवठा पूर्वपत केला जाईल'.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)