Mumbai Water Cut On May 28: मुंबई मध्ये पंजरापूर पंपिंग स्टेशनवर देखभालीच्या कामासाठी 13 तास पाणीपुरवठा राहणार बंद; पहा कोणते भाग होतील प्रभावित

बीएमसी कडे 28 मे दिवशी पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर पुरेसा पाणी साठा करण्याचा आणि साठवलेले पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला आहे.

Photo Credit- X

मुंबई मध्ये एकीकडे मान्सून पूर्व सरी कोसळत असताना पालिकेकडून पावसाळ्यापूर्वीची काम लवकर उरकण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. यंदा मान्सून अपेक्षेपूर्वी दाखल झाला असल्याने महाराष्ट्रातही त्याचं आगमन लवकर होण्याचा अंदाज आहे. अद्याप उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पालिकेने पाणी कपातीची घोषणा केलेली नाही पण बीएमसी ने 28 मे दिवशी सकाळी 13 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचं म्हटलं आहे. 28 मेला सकाळी 9.45 ते रात्री 10.45 पर्यंत पंजरापूर पंपिंग स्टेशनवर new anti-surge vessel (pressure control tank) सुरू करण्याचे काम हाती घेतले आहे. या 12 तासांच्या कालावधीत, आयलंड सिटी आणि पूर्व उपनगरांमध्ये 15% पाणीकपात करणार आहेत.

मुंबईत पाणी कपात कोणत्या विभागात असेल?

पाणी कपाती दरम्यान एफ साउथ (परळ) आणि एफ नॉर्थ (माटुंगा, वडाळा) या दोन महानगरपालिका वॉर्डांना पूर्णपणे 15% पाणीकपात सहन करावी लागेल. टी वॉर्ड (मुलुंड पूर्व आणि पश्चिम), एस वॉर्ड (भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी पूर्व), एन वॉर्ड (विक्रोळी, घाटकोपर पूर्व), एल वॉर्ड (कुर्ला पूर्व), एम पूर्व वॉर्ड (गोवंडी, मानखुर्द) आणि एम पश्चिम वॉर्ड (चेंबूर) यासह इतर अनेक भागातही पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.दरम्यान, मुंबईहून पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे आणि भिवंडी-निजामपूरच्या काही भागांमध्येही १५ टक्के कपात करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. नक्की वाचा: Fake News Alert: मुंबई मध्ये फिल्टर न केलेल्या पाण्याचा पुरवठा होत असल्याचे दावे सोशल मीडीयात वायरल; BMC ने केला खुलासा.  

मुंबईत 28 मे ला पाणीकपात

बीएमसी कडे 28 मे दिवशी पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर पुरेसा पाणी साठा करण्याचा आणि साठवलेले पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement