Mumbai Water Cut: मुंबई मध्ये 31 मार्चापासून महिनाभर 15% पाणी कपात

ठाण्यात बोअरवेल खोदताना काही ठिकाणी पाईपलाईनला फटका बसल्याने पाण्याची गळती होत आहे त्याच्या दुरूस्तीचं काम करण्यासाठी ही कपात करण्यात आली आहे.

BMC Water Cut| PC: Pixabay.com

मुंबईकरांना 31 मार्चपासून पुढे महिनाभर पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार 31 मार्चपासून पुढे 30 दिवस मुंबईमध्ये 15% पाणी कपात केली जाणार आहे. ठाण्यात बोअरवेल खोदताना काही ठिकाणी पाईपलाईनला फटका बसल्याने पाण्याची गळती होत असल्याचं चित्र आहे. त्याच्या दुरूस्तीच्या कामासाठी आता ही पाणी कपात केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बीएमसी च्या माहितीनुसार, भांडुप वॉटर कॉम्प्लेक्स मध्ये मुंबईला पाणी पुरवठा होणारा 65% साठा आहे. 15 किमी लांब ही जलवाहिनी असून तिचा व्यास 5500 मीमी आहे. ठाण्यामध्ये बोअरवेल खोदताना ही जलवाहिनी पंक्चर झाली आहे. यामुळे मोठी पाणी गळती होत आहे. हे काम करण्यासाठी वाहिनीला आयसोलेट करावं लागणार आहे. पर्यायी वाहिनी द्वारा भांडूप मधून पाणी पुरवठा करावा लागणार असल्याची माहिती बीएमसी च्या रिलीज मध्ये सांगण्यात आले आहे.

पहा ट्वीट

वाहिनी दुरूस्तीच्या कामासाठी बंद करण्यात येणार असल्याने मुंबई उपनगरामध्ये पाणी पुरवठा विस्कळित होणार आहे. त्यामुळे 15% पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईकरांनी पाणी सांभाळून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.