वडाळा येथील 13 वर्षीय मुलाने उंच इमारतीच्या टेरेसवरुन उडी टाकत केली आत्महत्या
वडाळा (Wadala) येथील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने उंच इमारतीच्या टेरेसवरुन उडी टाकत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
वडाळा (Wadala) येथील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने उंच इमारतीच्या टेरेसवरुन उडी टाकत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर गुरुवारी (11 जुलै) दुपारी ट्युशनवरुन आल्यानंतर मुलाने इमारतीच्या टेरेवर जात खाली उडी मारली आहे.
रियान चक्रवर्ती असे तरुणाचे नाव आहे. भक्तीपार्क मधील गिरनार टॉवरमध्ये रियान 16 व्या मजल्यावर राहत होता. तर काल दुपारी रियान क्लासवरुन आल्यानंतर त्याने धावत थेट टेरेस गाठले. त्यानंतर अचानक टेरेसवरुन रियान याने उडी मारली. या प्रकरणी रियानचा मृत्यू झाला आहे.
(मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंकवरुन तरुणाने उडी मारत संपवले आयुष्य, शोधकार्य सुरु)
पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता रियान याच्या मित्रांनी त्याच्याबद्दल सांगितले. तसेच रियान अभ्यासात हुशार असून त्याला कोणतीच समस्या भेडसावत नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र रियान याने अशा कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर काहींनी ब्लू व्हेल नावाच्या जीवघेण्या खेळासोबत त्याचा संबंध जोडत आहेत.