मुंबई: विरार प्लॅटफॉर्मवर गर्भवती महिलेला घेऊन जाण्यासाठी चक्क रिक्षाची धाव (Watch Video)
मुंबईतील (Mumbai) विरार (Virar) प्लॅटफॉर्मवर गर्भवती महिलेला घेऊन जाण्यासाठी चक्क ऑटोरिक्षाने धाव घेतली असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
मुंबईतील (Mumbai) विरार (Virar) प्लॅटफॉर्मवर गर्भवती महिलेला घेऊन जाण्यासाठी चक्क ऑटोरिक्षाने धाव घेतली असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तसेच महिलेला रेल्वेप्रवासादरम्यान प्रसुती कळा सुरु झाल्याने तिला या रिक्षात तातडीने बसवण्यात आले.
या प्रकारानंतर महिलेला सुखरुप नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्लॅटफॉर्मवर धाव घेतलेल्या रिक्षाचालकाला प्रथम अटक करण्यात आले होते. परंतु न्यायालयाचा आदेशानंतर या चालकाची सुटका करण्यात आली आहे.(ठाणे: वर्तकनगर येथील गृहसंकुलात मगर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण)
यापूर्वीसुद्धा गर्भवती महिलांची प्रसूती रेल्वेस्थानकात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच रेल्वेस्थानकावरील वन रुपी क्लिनिकमध्ये सुद्धा प्रवासादरम्यान प्रसुतीकळा सुरु झालेल्या महिलांवर उपचार करण्यात आले आहेत.