Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकाच्या तारखा पुढे ढकलल्या, जाणून घ्या मतदान कधी

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील सिनेट निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या असून त्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येण्याची शक्यता आहे.

Mumbai University | (Photo Credits: mu.ac.in)

Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील सिनेट निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या असून त्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एमयूने निवडणुकीचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर केले आहे. 21 एप्रिल रोजी मतदान होईल, असे एमयू वेळापत्रकात नमूद केले आहे. सोमवारपासून सुरू झालेली नवीन नोंदणी प्रक्रिया 90,000 हून अधिक वैध मतदारांसाठी अन्यायकारक आहे, असा आरोप माजी सिनेट सदस्यांनी केला आहे.

माहितीनुसार यापुर्वी निवडणुका १० सप्टेंबर रोजी होणार होतं. मतदार यादीत गोंधळ झाल्यामुळे विद्यापीठाने ही निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. विद्यापीठाने निवडणूकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार निवडणूकीची अधिसूचना २९ फेब्रुवारीला काढण्यात येणार आहे. निवडणूकीत उभे राहण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे ११ मार्चपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

सिनेटच्या पदवीधर मतदारसंघासाठी २१ एप्रिलला मतदान घेतले जाणार आहे. तर मतमोजणी २४ एप्रिलला केली जाणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे. आता नव्याने मतदार नोंदणी करताना ज्या पदवीधरांनी आधी शुल्क भरून नोंदणी केली आहे, त्यांना दिलासा मिळाला आहे.