Mumbai University Admission 2019 मध्ये बदल; 17 जूनला जाहीर होणार mu.ac.in वर पहिली मेरीट लिस्ट, येथे पहा सुधारित वेळापत्रक

मात्र आता त्यामध्ये बदल करत नव्या वेळापत्रकानुसार 17 जून दिवशी ही यादी mu.ac.in वर जाहीर केली जाणार आहे.

Mumbai University Admission 2019 (Photo Credit: unsplash.com)

मुंबई युनिव्हर्सिटीच्या विविध अभ्यासक्रमांसाठी जाहीर होणारी पहिली मेरिट लिस्ट आज (13 जून) दिवशी जाहीर होणार होती. मात्र आता त्यामध्ये बदल करत नव्या वेळापत्रकानुसार 17 जून दिवशी ही यादी mu.ac.in वर जाहीर केली जाणार आहे. तसेच 14 जून ऐवजी 18 जूनपासून विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची छाननी सुरू होणार आहे. यंदा 6 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये प्रवेश अर्ज दाखल केले आहेत. मात्र महाराष्ट्र बोर्डाकडून HSC Marksheet देण्यास उशिर झाल्याने आता ही प्रवेशप्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठ प्रवेशप्रक्रियेचं नवं वेळापत्रक

Mumbai University Admissions 2019 साठी आवश्यक कागदपत्र

विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास 02066834821 या हेल्पलाईन क्रमांकावर ते संपर्क साधू शकतात. मुंबई विद्यापीठ वेळोवेळी होणारी अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवते.