Mumbai Traffic Update: अंधेरीचा गोखले पूल आजपासून बंद; त्याऐवजी या '6' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन

अंधेरीचा पूल बंद असल्याने चालकांचा गोंधळ होऊ नये आणि वाहतूक कोंडीची समस्या आटोक्यात रहावी यासाठी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन मुंबई ट्राफिक पोलिसांनी केले आहे.

Image used for representational purpose only (Photo Credits: Wikimedia Commons, Lakun.patra)

अंधेरी पूर्व ते पश्चिमेला (Andheri East-West) जोडणारा गोखले ब्रिज (Gokhle Bridge) आता डागडूजीच्या कामांसाठी आजपासून बंद करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती मुंबई ट्राफिक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) देण्यात आलेली आहे. बीएमसी (BMC) कडून याची पाहणी झाल्यानंतर हा पूल पुनर्बांधणीसाठी बंद करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा पूल मुंबई उपनगरामधील सर्वात जास्त रहदारी असणार्‍या पूलांपैकी एक आहे.

वाहतूकीसाठी असुरक्षित असल्याने अंधेरीचा गोखले पूल आजपासून पूर्णपणेच बंद असणार आहे. कोणत्याही वाहनांची या पूलावरून वाहतूक होणार नाही. किमान पुढील 2 महिने हा पूल बंद ठेवला जाणार असल्याची माहिती दिली जात आहे. या पूलामुळे आता ट्राफिकच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. नक्की वाचा:  Mumbai Traffic Police कडून 10 नोव्हेंबर पर्यंत Seat Belt Awareness Drive; 11 नोव्हेंबरपासून चारचाकीत सहप्रवाशांनीही सिट बेल्ट न लावल्यास कारवाईचा बडगा .

अंधेरीचा पूल बंद असल्याने चालकांचा गोंधळ होऊ नये आणि वाहतूक कोंडीची समस्या आटोक्यात रहावी यासाठी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन मुंबई ट्राफिक पोलिसांनी केले आहे.

पर्यायी रस्ते कोणते?

खार सबवे, खार

मिलन सबवे उड्डाणपूल, सांताक्रूझ

कॅप्टन गोरे उड्डाणपूल (विलेपार्ले उड्डाणपूल), विलेपार्ले

अंधेरी सबवे, अंधेरी, मुंबई

बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल, जोगेश्वरी

मृणालताई गोरे उड्डाणपूल, गोरेगाव

अंधेरीचा गोखले पूलाचा काही भाग जुलै 2018 मध्ये कोसळला होता. यामध्ये 2 जणांनी जीव गमावला आहे. या घटनेनंतर बीएमसीकडून पुलांच्या सुरक्षेसाठी ऑडिट करण्यात आले होते. आयआयटी मुंबईकडून पुलाचं ऑडिट झालं आहे. पूलाचा एक भाग कोसळल्यानंतर गोखले रोड पूला अंशतः वाहतूकीसाठी खुला होता. यामुळे देखील पूलावर मोठी वाहतूक कोंडी होते. पण आता तो पूर्ण बंद करून त्याच्या पुनर्बांधणीचं काम हातात घेण्यात आलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif