मुंबई वाहतूक पोलिसांनी उड्डाणपूल, महामार्गावर वाहनांच्या वेगासाठी बनवले नवे नियम, जाणून घ्या सविस्तर
हे नियम न पाळणा-यावर कडक कारवाईची भूमिका ही त्यांनी घेतली आहे. मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहनांची संख्या लक्षात घेता हा बदल करण्यात आला आहे.
मुंबईतील उड्डाणपूल, महामार्गावर होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक विभागाकडून नवनवे उपाय केले जातात. मात्र तरीही वाहनावरील वेगाला नियंत्रणात आणणे अजून अनेकांच्या पथ्यावर पडले नाही. म्हणूनच सुरक्षेच्या दृष्टीने आणि खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी उड्डाणपूल, महामार्गावर वेगासाठी पोलिसांनी नवीन नियम बनवले आहेत. हे नियम न पाळणा-यावर कडक कारवाईची भूमिका ही त्यांनी घेतली आहे. मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहनांची संख्या लक्षात घेता हा बदल करण्यात आला आहे.
मुंबईतील वाढत्या लोकसंख्येसोबत वाढत्या वाहनांची संख्या पाहता अपघाताचे प्रमाणही वाढत जात आहे. अशा परिस्थितीतही मुंबईत हॉर्न वाजवणे आणि भरधाव वाहने चालवणे हा प्रकार सर्रासपणे सुरु आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. म्हणूनच उड्डाणपूल आणि महामार्गावर वेगाचे नवीन नियम ठरविण्यात आले आहे. Mumbai: सायन उड्डाणपूल दुरुस्ती कामासाठी 27 फेब्रुवारीपासून 5 दिवस बंद; वाहतुकीवर होणार परिणाम
त्यात वांद्रे-वरळी सी लिंक आणि पूर्व द्रुतगती मार्गावर चार चाकी वाहनांना ताशी 80 किमी तर दुचाकी वाहनांना ताशी 90 किमी वेग ठरविण्यात आला आहे. हे नियम सायन पनवेल महामार्ग, सांताक्रूज-चेंबूर लिंक रोड आणि लालबाग उड्डाणपूलावर लागू करण्यात आले आहेत.
तर जे.जे. उड्डाणपूल ताशी 60 किमी वेग ठरविण्यात आला आहे. तर मरीन ड्राईव्हवर ताशी 65 किमी वेग ठरविण्यात आला आहे.
मुंबईमधील सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु झाले असून 27 फेब्रुवारीपासून उड्डाणपूल पाच दिवस बंद राहणार आहे.सोमवार 2 मार्च सकाळी 7 वाजेपर्यंत सायन उड्डाणपुल दुरुस्तीच्या कामासाठी पूर्णतः बंद राहील.