Mumbai Traffic Diversion On Dec 5: महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी 5 डिसेंबरला दक्षिण मुंबई मध्ये वाहतूकीत बदल; पहा कोणते मार्ग बंद
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपा ने राज्यात 132 जागा, शिवसेनेने 57 आणि एनसीपी ने 41 जागा जिंकल्या आहेत. आता नव्या सरकारच्या शपथविधीचा भव्य सोहळा मुंबईमध्ये होणार आहे.
मुंबई ट्राफिक पोलिस (Mumbai Traffic Police) कडून आझाद मैदानावर (Azad Maidan) होणार्या नव्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल जारी केले आहे. नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला दक्षिण मुंबई मध्ये आझाद मैदानावर होणार आगे, या शपथविधीला मोठ्या संख्येने नागरिकही उपस्थिती लावतील असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि VVIP यांची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी काही रस्ते बंद ठेवले आहेत तर काही ठिकाणी वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
दक्षिण मुंबई मध्ये वाहतूकीमधील बदल गुरूवार 5डिसेंबरला दुपारी 12 वाजल्यापासून लागू असणार आहे. हा शपथविधीचा सोहळा पूर्ण होईलपर्यंत हे बदल लागू असतील. आझाद मैदानावर पार्किंगची सोय नसेल. त्यामुळे नागरिकांना सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी गुरूवारी दक्षिण मुंबई मध्ये प्रवास करताना काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. Devendra Fadnavis: भाजप विधिमंडळ गटनेता पदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती; मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा .
कोणत्या भागात एंट्री नसेल?
- सीएसएमटी जंक्शन ते वासुदेव बळवंत फडके चौक ( मेट्रो जंक्शन) या भागात दोन्ही बाजूने वाहतूक बंद असेल.
- चाफेकर बंधू चौक ते वासुदेव बळवंत फडके चौक ( मेट्रो जंक्शन) दरम्यान दोन्ही बाजूने वाहतूक बंद असेल.
- महापालिका मार्ग वर वाहतूक सीएसएमटी जंक्शन ते वसुदेव बळवंत फडके मार्गावर दोन्ही बाजूने वाहतूक बंद असेल.
- चाफेकर बंधू चौक ते सीएसएमटी जंक्शन दरम्यान वाहतूक बंद असणार
- मेघदूत ब्रिज (प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज) - एनएस रोड आणि कोस्टल रोडकडून शामलदास गांधी जंक्शनकडे जाणारी वाहतूक बंद असणार आहे.
- रामभाऊ साळगावकर रस्ता (वन वे ) - इंदू क्लिनिक जंक्शन (सय्यद जमादार चौक) ते व्होल्गा चौक हा रस्ता दुतर्फा वाहतुकीसाठी खुला असेल.
पर्यायी मार्ग कोणते?
- LT मार्ग – चकाला जंक्शन – उजव्या बाजूने DN रोड – CSMT जंक्शन द्वारा तुम्ही पुढे जाऊ शकाल.
- महर्षी कर्वे रोड वरून पुढे रस्ता खुला आहे.
- चाफेकर बंधू चौक (OCS जंक्शन) – हुतात्मा चौक – काळाघोडा – के दुभाष मार्ग – शहीद भगतसिंग मार्ग वरून तुम्हांला पुढे हव्या त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग खुला असेल.
दि. ५/१२/२०२४ रोजी आझाद मैदान आतील बाजूस “शपथविधी सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. सदर शपथविधीकरिता बहुसंख्येने लोक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमादरम्यान वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता नमूद वाहतूक बदल हे दि. ५/१२/२०२४ रोजी सकाळी १२ ते कार्यक्रम संपेपर्यंत लागू राहतील. pic.twitter.com/DDCMSexjDM
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) December 4, 2024
दरम्यान मुंबई मध्ये होणार्या महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था चोख ठेवली जाणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2024 01:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

