मुंबईत आज नवे 791 कोरोनाबाधित रुग्ण तर धारावीत 57 जणांना COVID19 चे संक्रमण, शहरातील आकडा 14355 वर पोहचला

त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. राज्यात कोरोनाचा वेग संथ करण्यास सरकारला यश आले आहे.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. राज्यात कोरोनाचा वेग संथ करण्यास सरकारला यश आले आहे. परंतु कोरोनाची साखळी अद्याप तुटली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. याच दरम्यान, मुंबईतील धारावी परिसरात सर्वाधिक मोठी झोपडपट्टी असून येथे आज 57 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीत आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 916 वर पोहचला असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. त्याचसोबत मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 14355 वर पोहचला आहे.

धारावी हा परिसर कंन्टेंटमेंट झोनमध्ये असून तेथे कोणत्याही गोष्टी सुरु करण्यास परवानगी नाही आहे. तसेच धारावीत पोलिसांचा कडक बंदोबस्त असून नागरिक घराबाहेर पडू शकत नाहीत. धारावीत घरे दाटीवाटीने असून तेथे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे कठीण आहे. तरीही या ठिकाणी कोरोना संबंधित संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वी धारावीत डॉक्टरांच्या पथकाने धारावीतील नागरिकांची स्क्रिनिंगच्या माध्यमातून तपासणी केली होती.(Coronavirus: पीएम नरेंद्र मोदी व सीएम उद्धव ठाकरे यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक; पीक कर्ज, GST परतावा यांसह गरजेच्या लोकांसाठी लोकल रेल्वे सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी)

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा सर्वाधिक असून आज 20 जणांचा बळी आणि 791 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 14355 वर पोहचला असून 3110 जणांची प्रकृती सुधारली आहे. एकूण 528 जणांचा आतापर्यंत मुंबईत बळी गेला आहे.(कोरोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्टच्या 70 कर्मचाऱ्यांची COVID19 चाचणी पॉझिटिव्ह)

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करावी असे म्हटले आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पार गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु आपल्याला कोरोनाच्या विरोधात लढण्यास यश नक्कीच येईल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.