मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत आता वॉटर टॅक्सी च्या पर्यायाचीही विचार सुरू
मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना जेट्टी आणि टर्मिनलच्या बांधकामासाठी औपचारिक प्रस्ताव तयार करण्याचे आणि विमानतळ अधिकाऱ्यांसोबत मंजुरी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी (Navi Mumbai International Airport) कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून, सिडको आणि महाराष्ट्र बंदर विभागाने सोमवारी दक्षिण मुंबईतून वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या योजनांवर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कुलाबा येथील रेडिओ क्लब जवळ लवकरच विकसित होणाऱ्या जेट्टीवरून ही सेवा सुरू होईल आणि प्रवाशांना सुमारे 40 मिनिटांत विमानतळावर पोहोचता येईल अशी अपेक्षा आहे. या मार्गासाठी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी वापरल्या जातील, ज्यामुळे जलद आणि अधिक शाश्वत प्रवास पर्याय उपलब्ध होईल.
सध्या मुंबई मधून नवी मुंबई मध्ये प्रवास करण्यासाठी अटल सेतू आहे. अटल सेतू मार्गे प्रवासाला सुमारे 60 मिनिटं ते 75 मिनिटांचा प्रवास आहे. यामध्येही ट्राफिक वर ही वेळ अवलंबून आहे. वॉटर टॅक्सी सुरू झाल्यास प्रवासाचा 30 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. सोबतच रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि इंधन वाचवण्यासही मदत होईल.
24 एप्रिल रोजी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नवी मुंबई विमानतळाला multi-modal transport connectivity आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन विमानतळ रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलवाहतुकीने जोडले जावे जेणेकरून सुरळीत प्रवेश सुनिश्चित होईल. नक्की वाचा: Mumbai Metro Line 8 Update: मुंबईकरांना दिलासा! छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व नवी मुंबई एअरपोर्टला जोडणारी मेट्रो लाईन 8 ही 2029 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता .
सोमवारच्या बैठकीत, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बंदरे मंत्री नितेश राणे यांना हा प्रस्ताव सादर केला. बंदरे विभागाच्या अंतर्गत येणारे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड (एमएमबी) थेट पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी विमानतळाशेजारी जेट्टी बांधण्यास मदत करेल. मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना जेट्टी आणि टर्मिनलच्या बांधकामासाठी औपचारिक प्रस्ताव तयार करण्याचे आणि विमानतळ अधिकाऱ्यांसोबत मंजुरी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले.
(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2025 11:19 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

