राजधानी ते राजधानी अर्थातच मुंबई ते दिल्ली रेल्वे प्रवास अधिक वेगवान

सध्या या गाडीची चाचणी सुरु आहे. त्यामुळे ही गाडी १३ फेब्रुवारी, बुधवारी ट्रेन क्रमांक २२२२१ डाऊन पुश-पूल पद्धतीने मार्गस्थ झाली.

Mumbai To Delhi rajdhani express | (Photo credit: archived, edited, representative image)

राजधानी मुंबई ते राजधानी दिल्ली हा प्रवास आता अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे. मुंबई ते दिल्ली (Mumbai To Delhi) असा दीर्घ पल्ल्याचा प्रवास करताना खर्च होणारा प्रवाशांचा वेळ वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु होते. या प्रयत्नांचाच भाग म्हणून राजधानी एक्सप्रेस (Rajdhani Express) 'पुश-पूल' पद्धतीने मार्गस्थ होणार आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Terminus railway station) ते दिल्ली (Delhi)अशी धावेल. तसेच, या गाडीमुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होील असा रेल्वे अधिकाऱ्यांना विश्वास आहे. दरम्यान, हा विश्वास किती सार्थ ठरतो हे ही गाडी दिल्लीला पोहोचल्यानंतरच समजणार आहे.

'पुश-पूल' पद्धतीने धावत असलेल्या या गाडीला (Rajdhani Express) रिसर्च डिजाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (RDSO) या संस्थेने यशस्वी वेगाबद्दल प्रमाणपत्र दिले आहे. सध्या या गाडीची चाचणी सुरु आहे. त्यामुळे ही गाडी १३ फेब्रुवारी, बुधवारी ट्रेन क्रमांक २२२२१ डाऊन पुश-पूल पद्धतीने मार्गस्थ झाली.

काय आहे पुश पूल प्रणाली?

रेल्वेचा वेग वाढविण्यासाठी पुश पूल ही प्रणाली राबवली जाते. पुश पूल या प्रणालीत रेल्वे डब्याच्या पुढच्या आणि पाठिमागच्या बाजूला एक एक असे दोन इंजिन जोडण्यात येतात. ज्यामुळे ट्रेनचा वेग वाढतो. तसेच, गाडीचा वेग नियंत्रत करण्यासाठीही अत्यंत कमी कालावधी लागतो. सध्यास्थिती या गाडीची चाचणी सुरु असली तरी, ही गाडी मुंबई ते दिल्ली प्रवासादरम्यानच्या एकूण कालावधीपैकी दोन तासांचा अवधी कमी करेल, असा अधिकाऱ्यांना विश्वास वाटतो. दरम्यान, या प्रयोगासाठी गाडीत विशेष असे मोठे बदल करण्यात आले नाहीत. (हेही वाचा, नकारात्मक प्रतिक्रियांनंतर, वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिट दरांबाबत रेल्वे प्रशासनाचे विचारमंथन सुरु)

दरम्यान, अलिकडील काही वर्षांमध्ये भारतीय रेल्वेचे विद्युतीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळेच हा क्रांतीकारक बदल आणि भारतीय रेल्वेला अधिक वेगाशी नाते जोडता येणे शक्य होत असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. दरम्यान, आणखी एक खुशखबर अशी की, राजधानी एक्सप्रेसला पंधरवडा होण्यापूर्वीच आणखी 21 डब्बे देण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. या 21 डब्ब्यांपैकी 10 डब्बे तृतीय वातानुकूलित, 6 द्वितीय वातानुकूलित असणार आहेत. तर याशिवाय 2 भोजनालयं आणि 3 जनरेटर डब्यांचाही यात समावेश असणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif