Online Astrology Scam: ऑनलाइन ज्योतिष पाहणे भोवले; मुंबई येथील अभियंत्यास 12.21 लाखांचा गंडा
Financial Scam Mumbai: मुंबईतील एका 24 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्यास ऑनलाइन ज्योतिष घोटाळ्यात 12.21 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. सायबर गुन्हेगारांनी त्याला फसव्या अॅपद्वारे आमिष दाखवून खोट्या बहाण्याने पैसे उकळले. सायबर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
Mumbai Crime News: मुंबई येथील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरात एका खाजगी कंपनीत काम करणारा 24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर सायबर गुन्हेगारांच्या गाळाला लागला. ज्यामध्ये ऑनलाईन ज्योतिष (Online Astrology Scam) पाहण्याच्या नादात त्याची तब्बल 12.21 लाख रुपयांची सायबर फसवणूक (Cyber Fraud) झाली. व्यक्तिगत आयुष्यात संघर्ष अनुभवणारा हा अभियंता आपले ज्योतिष (Fake Astrologers) जाणून घेण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी तो ऑनलाईन शोध घेत असल्याचे पाहून सायबर गुन्हेगारांनी त्यास हेरले आणि गळाला लावले. ज्योतिषाच्या जोरावर त्याचे आयुष् बदलून टाकण्याचे आमिष दाखवत गुन्हेगारांनी एका बनावट अॅपद्वारे त्याची आर्थिक फसवणूक केली. ज्यामुळे त्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
ज्योतिस घोटाळा आणि घटणाक्रम
पूजा करण्याचा सल्ला: अभियंत्याने सायबर पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्याने त्याच्या भविष्याबद्दल माहिती मिळविण्यासाठी जानेवारीमध्ये बनावट ज्योतिष अॅप डाउनलोड केले. अॅप वापरताना, तो स्थिरता आणि समृद्धीसाठी पूजा करण्याचा सल्ला देणाऱ्या एका व्यक्तीशी संपर्क साधला. (हेही वाचा, जयपूरमधील हे हॉस्पिटल रुग्णाची नस पाहून नाही, तर कुंडली पाहून करते उपचार, वाचा सविस्तर...)
जीवावर बेतण्याची भीती: सुरुवातीला, त्याला विधीसाठी 6,300 रुपये मागण्यात आले होते, जे त्याने एका आठवड्यानंतर दिले. त्यानंतर, त्याची ओळख एका तथाकथित ‘महाराज’शी करुन देण्यात आली. या महाराजाने दावा केला की, सुरुवातीची रक्कम फक्त सल्लामसलत शुल्क होती, प्रत्यक्ष पूजेसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. सुरुवातीला तक्रारदाराने महाराजाचे म्हणने ऐकले. पण पुढे फसवणूक करणारे अधिक पैशांची मागणी करत राहिले, त्यांनी विधी अपूर्ण असल्याचा दावा केला आणि ती सोडून दिल्याने त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो असा इशारा दिला. ज्यामुळे तक्रारदार घाबरला आणि अधिकच दबावाखाली आला. (हेही वाचा, Pune Cyber Crime : पुण्यातील डॉक्टरला सायबयर चोरट्यांचा गंडा, तोतया पोलीस बनून १ कोटी दीड लाखांना लुटले)
धमक्या आणि खंडणी
सायबर गुन्हेगारांनी तक्रारदाराव दबाव टाकण्यासाठी अशी कथा रचली की त्याच्या अपूर्ण पूजामुळे तीन साधूंचे जीव धोक्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर त्याचा इतका वाईट परिणाम होऊ शकतो की, ज्यामुळे अभियंत्याचे प्राणही धोक्यात आहे. परिणामांच्या भीतीने, सॉफ्टवेअर अभियंत्याने ऑनलाइन व्यवहार आणि क्रेडिट कार्डद्वारे एकूण12.21 लाख रुपये हस्तांतरित केले.
दरम्यान, फसवणूक लक्षात आल्यानंतर, पीडितेने एका मित्राला सांगितले, ज्याने त्याला घटनेची तक्रार करण्यास सांगितले. त्याच्या तक्रारीवर कारवाई करून, सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि फसव्या ज्योतिष नेटवर्कचा तपास सुरू केला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)