Coronavirus: मुंबई येथील जीटी रुग्णालयातून एका कोरोना संशियताचे पलायन
तसेच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून कोरोनाबाधित रुग्णांच्या बचावासाठी योग्य काळजी घेतली जात आहे. मात्र, मुंबईतील (Mumbai) जीटी रुग्णालयातून (GT Hospital) एका कोरोना संशयित रुग्णाने पलायन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोनाचा विषाणूचा (Coronavirus) सामना करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. तसेच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून कोरोनाबाधित रुग्णांच्या बचावासाठी योग्य काळजी घेतली जात आहे. मात्र, मुंबईतील (Mumbai) जीटी रुग्णालयातून (GT Hospital) एका कोरोना संशयित रुग्णाने पलायन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबईतील नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. गिरगाव येथील व्ही.पी रोड परिसरात संबंधित रुग्णामध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र, रविवारी रात्री करोना संशयित रुग्णालयातून फरार झाल्यानंतर झाल्याचे समजताच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळवले. रुग्णालयाने सोमवारी आझाद मैदान पोलीस रुग्णालयात तक्रार दाखल केली.
गोकुदास तेजपाल (40) असे, कोरोना संशयित रुग्णाचे नाव आहे. तेजपाल याच्यात कोरोना विषाणूचे लक्षणे दिसताच त्याला मुंबईतील जीटी रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तेजपाल याच्यासह आणखी 8 जणांना एकाच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र, रविवारी तेजपालने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना वॉशरूमला जात असल्याचा बहाणा करत रुग्णालयातून रुग्णालयातून फरार झाला, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण मुंबई शहरात एकाच खळबळ उडाली आहे. हे देखील वाचा- PPE घालणे वेदनादायी तर कोरोनाग्रस्तांवर उपचार करणे कठीण; कोविड 19 रुग्णांची सेवा करुन महिन्याभरानंतर परतलेल्या नर्सने सांगितला अनुभव
Petrol Diesel Price: केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ - Watch Video
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरात आढळून आले आहेत. मुंबईत आतापर्यंत 9 हजार 945 रुग्णांची नोंद झाल आहे. त्यापैकी 387 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 605 जणांनी कोरोनावर मात केली आहे.