मुंबई उपनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: कुर्ला ते वांद्रे पूर्व चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून
पहा मुंबई शहरातील विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या सहा मतदार संघांमध्ये पहा यंदा कोणत्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये रंगणार चुरशीची लढाई?
Maharashtra Assembly Elections 2019: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकांमध्ये मुंबईकरांची मनं जिंकत विधानसभेवर विजयाचा पताका रोवण्यासाठी सार्यांचीच धडपड सुरू आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांमध्ये मिळून एकुण 36 मतदारसंघांमध्ये 21 ऑक्टोबर दिवशी मुंबईकर मतदान करणार आहेत. मग पहा मुंबई शहरातील विलेपार्ले (Vile Parle Vidhan Sabha Constituency), चांदिवली (Chandivali Vidhan Sabha Constituency), कुर्ला (Kurla Vidhan Sabha Constituency) , कलिना(Kalina Vidhan Sabha Constituency) , वांद्रे पूर्व (Vandre East Vidhan Sabha Constituency), वांद्रे पश्चिम (Vandre West Constituency) या सहा मतदार संघांमध्ये पहा यंदा कोणत्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये रंगणार चुरशीची लढाई? इथे पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ चा सारे अपडेट्स.
सध्या सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपा महायुतीने 2014 सालच्या विधानसभा निवडणूकीमध्ये अनुक्रमे 14 आणि 15 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदाही मुंबई शहरावर वर्चस्व राखण्यासाठी सार्याच पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ
मुंबई उपनगरामधल्या मध्यमवर्ग आणि उच्च-मध्यमवर्ग यांचं विलेपार्ले विधानसभा मतदारसंघामध्ये वर्चस्व आहे. सध्या या मतदारसंघात भाजपाचे आमदार पराग अळवणी सत्तेमध्ये आहेत. यंदाही भाजपाकडून पराग अळवणी यांना तिकीट देण्यात आले आहे तर त्यांच्या विरूद्ध कॉंग्रेसच्या जयंती जिवाभाई सिरोया आणि जुईली शेंडे यांचे आव्हान आहे.
चांदिवली विधानसभा मतदारसंघ
मुंबईतला सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ म्हणून चांदिवलीची ओळख आहे. या मतदारसंघात 4 लाखांहून अधित मतदार आहेत. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांचं प्रमाण अधिक आहे. काँग्रेसचे नसीम खान हे विद्यमान आमदार आहेत. यंदा नसीम खान यांच्या विरूद्ध शिवसेनेच्या दिलीप लांडे यांचं आव्हान आहे. सोबतच अपक्ष म्हणून सुमित भास्कर निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
कुर्ला विधानसभा मतदारसंघ
2008 साली करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे या मतदार संघामध्ये एकाच एकाच पक्षाचा दबदबा नाही. शिवसेनेचे कट्ट्र समर्थक मंगेश कुडाळकर हे या विधानसभा मतदार संघामध्ये आमदार आहेत. तर आगामी निवडणूकांसाठी त्यांच्याविरूद्ध आघाडीच्या मिलिंद कांबळे आणि मनसेचे अप्पासाहेब अवचरे यांचे आव्हान आहे.
कलिना विधानसभा मतदारसंघ
मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गीय असा संमिश्र असलेल्या कलिना मतदार संघामध्ये उत्तर भारतीयांचे वर्चस्व आहे. शिवसेनेचे संजय पोतनीस सध्या विद्यमान आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये कॉंग्रेसचे जॉन अब्राहम आणि संजय तुर्डे यांचे आव्हान आहे.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्र विधानसभेत सध्या सत्तेत असलेल्या भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांपैकी एक वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ आहे. ठाकरे कुटुंबीय या मतदारसंघाचे रहिवासी असल्याने मुंबईतील हा एक हायप्रोफाईल मतदारसंघ म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. आगामी निवडणूकांसाठी शिवसेनेच्या तृप्ती सावंत या मतदार संघातील विद्यमान आमदार आहेत. यंदा शिवसेनेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर विरूद्ध कॉंग्रेसचे झिशान सिद्दकी आणि मनसेचे अखिल चित्रे असा सामना रंगणार आहे.
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ
अल्पसंख्यांक, ख्रिश्चन यांच्या वस्त्या, उच्चभ्रू आणि झोपडपट्ट्या यांचा समावेश आहे. त्याच्यामुळे विशिष्ट समाज गट व्होट बॅंक बनवून या मतदार संघामध्ये प्रचार करून निवडणूक जिंकण्यावर सार्याच राजकीय पक्षांचा डोळा आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार सध्या या येथील आमदार आहेत. यंदा विधानसभा निवडणूकीत त्यांचा सामना असफ जकेरिया यांच्यासोबत होणार आहे.
सध्या अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली आहे. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.