Mumbai: विकेंड् लॉकडाऊनच्या कठोर निर्बंधांचा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर कोणताच परिणाम नाही- अस्लम शेख

अशातच राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन सुद्धा लागू करण्यात आला आहे.

Aslam Shaikh (Photo Credits: ANI)

Mumbai:  मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाकडून वेळोवेळी ठोस पावले उचलली जात आहेत. अशातच राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन सुद्धा लागू करण्यात आला आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र राज्यात तरीही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने काही दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे. अशातच आज राज्य सरकारमधील सर्व नेत्यांसह विरोधी पक्षांतील महत्वाच्या मंडळींनी बैठकीला उपस्थिती लावली होती. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्राचे मंत्री अस्लम शेख यांनी विकेंड लॉकडाऊन लागू केला असला तरीही त्याचा वाढत्या कोरोनाच्या रुग्णांवर कोणताच परिणाम होत नाही असे म्हटले आहे.(Weekend Lockdown in Maharashtra: राज्यातील निर्बंधांदरम्यान नक्की काय सुरु व काय बंद याबाबत शासनाने जारी केले FAQs; जाणून घ्या कोणती दुकाने उघडी असतील)

राज्य सरकारकडून संपूर्ण लॉकडाऊन लागू न करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठीच सध्या विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र त्याचा कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर कोणताच परिणाम होत नाही आहे. आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा झाल्याचे ही अस्लम शेख यांनी सांगितले आहे.(नागपूरात रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई दूर करण्यासाठी नितीन गडकरींनी घेतला पुढाकार, 'सन फार्मा'तर्फे या इंजेक्शनचे 10 हजार डोसेज उपलब्ध करून देणार)

Tweet:

दरम्यान, शहरात कोरोना लसीचा पुरवठा अपुरा पडू लागल्याने आता खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रे येत्या सोमवार पर्यंत बंद राहणार आहेत. फक्त शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयात लसीकरण सुरु राहिल अशी माहिती महापालिकेने ट्विट करत दिली आहे. ही स्थिती फक्त  मुंबई पुरतीच मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात लसीचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे लसीचा डोस घेण्यासाठी पोहचलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्रावर लस संपल्याचे बोर्ड लावल्याने परत माघारी यावे लागत आहेत. त्याचसोबत बहुतांश जणांचा कोरोनाचा दुसरा डोस सुद्धा सध्या मिळणे मुश्किल झाले आहे.