Speeding Audi Hits Autorickshaws: भरधाव ऑडी कारची ऑटोरिक्षाला धडक, तिघे जखमी; मुंबई येथील घटना

ऑडी या लक्झरी कारने दोन ऑटोरिक्षांना धडक (Speeding Audi Hits Autorickshaws) दिली. या अपघातात तिघे जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मुलुंड पोलिसांनी अपघातास (Traffic Accident) कारण ठरलेली ऑडी ताब्यात घेतली आहे.

Road Accident

मुंबई शहरात आज पुन्हा एकदा आलिशान कारने (Luxury Cars) वाहनांना धडक देण्याची घटना घडली. ऑडी या लक्झरी कारने दोन ऑटोरिक्षांना धडक (Speeding Audi Hits Autorickshaws) दिली. या अपघातात तिघे जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मुलुंड पोलिसांनी अपघातास (Traffic Accident) कारण ठरलेली ऑडी ताब्यात घेतली आहे. मात्र अपघातानंतर या कारचा चालक बेपत्ता आहे. अलिकडेच घडणाऱ्या हिट अँड रन प्रकरणे आणि कारखाली चिडल्या जाण्याच्या अपघात मालिकेतीलच हा एक अपघात असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

मुंबई मध्ये हिट अँड रन प्रकरण ताजे

ऑडी कार अपघातात जखमी झालेल्या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये ऑटोचालकाचा समावेश आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. हा अपघात शहरात घडलेल्या लक्झरी कारच्या दोन हिट-अँड-रन घटनांनंतर घडला आहे. ज्यामुळे लोकांमध्ये लक्षणीय रोष निर्माण झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला शिवसेना नेत्याच्या 24 वर्षीय मिहिर शाह नामक मुलाने भरधाव वेगाने हाकलेल्या बीएमडब्ल्यू कारने एका महिलेस चिरडले. मुंबई येथील वरळी परिसरात राहणारे नाखवा दाम्पत्य आपल्या दुचाकीवरुन निघाले असता बीएमडब्ल्यू कारने त्यांना धडक दिली. ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. वृद्ध महिलेवर धावून गेला. या घनेत मिहीर याने प्रचंड प्रमाणावर मद्यपान केल्याचे पुढे आले आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. (हेही वाचा, Hit and Run in Pune: पुण्यात पुन्हा हिट अँड रन, पिंपरी गावात भरधाव कारने महिलेला उडवले, पहा व्हिडिओ)

पुणे येथेही हिट अँड रन

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत, पुण्यातील एका बांधकाम व्यवसायिकाच्या अल्पवयीन मुलाने रात्री उशिरा गाडी चालवताना त्याच्या पोर्शे कारने दोघांना चिरडले. ज्यामध्ये दोन 24 वर्षीय युवक आणि युवतीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणातील अल्पवयीनसुद्धा दारुच्या नशेत असल्याचे आढळून आले. या प्रकरणात आरोपीला वाचविण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले. इतके की, आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलण्यासह त्याच्या कुटुंबाने त्याला वाचवण्यासाठी पोलिसांवरही दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे पुढे चौकशीत उघड झाले.

सार्वजनिक प्रतिक्रिया आणि कायदेशीर कृती

दरम्यान, अशा घटनांमुळे आलिशान गाड्या चालवणाऱ्या गुन्हेगारांविरोधात जनक्षोभ निर्माण झाला आहे. या प्रकरणांमध्ये वेळेवर तपास आणि अटकेची कारवाई होते. मात्र, पुढे हे आरोपी निर्दोष सुटत असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये पुढे आले आहे. त्यामुळे अशा गाड्या परवडणारे श्रीमंत लोक गंभीर गुन्हे करूनही शिक्षेपासून वाचतात आणि सामान्य समजाला आव्हान देतात, अशी जनमानसात प्रतिक्रिया उमटत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif