Sachin Waze ची आता मुंबईत बार, रेस्टॉरंट मध्ये 100 कोटींच्या वसुलीच्या आदेशा प्रकरणी CBI कडून NIA कोठडीत चौकशी होणार

आज सीबीआयने एनआयए कोर्टात सचिन वाझेच्या चौकशीच्या परवानगी साठी अर्ज दाखल केला होता तो आता मंजूर झाला आहे

Sachin Waze (Photo Credits: ANI)

आधी मनसुख हिरेन नंतर अ‍ॅन्टिलिया खाली स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आणि आता सचिन वाझे ची माजी गृहमंत्री अनिल देशमुखांकडून (Anil Deshmukh) त्यांना मुंबईत बार आणि रेस्टॉरंट्स मध्ये 100 कोटींच्या वसुलीच्या आदेशा प्रकरणी चौकशी होणार आहे. एनआयए स्पेशल कोर्टातून याबाबत सीबीआय (CBI)  ने केलेला अर्ज मंजूर करत त्यांना सचिन वाझेच्या एनआयए कोठडीमधील चौकशीला परवानगी दिली आहे. दरम्यान आज सचिन वाझेच्या (Sachin Waze) एनआयए पोलिस कोठडीमध्ये 9 एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. आता सीबीआयला सचिन वाझेच्या चौकशीसाठी एनआयए (NIA) कडून वेळ मागून घ्यायचा आहे.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह विरूद्ध अनिल देशमुख हे प्रकरण गाजत आहे. सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवत अनिल देशमुखांनी वाझेला मुंबईत 100 कोटीच्या वसुलीचे आदेश दिल्याचे खळबळजनक आरोप झाले. यानंतर देशमुखांनी देखील सिंह यांच्याकडून अक्षम्य चूका झाल्याने त्यांची बदली केल्याचं जाहीर केली आणि त्यानंतर या दोघांमधील संघर्ष वाढत गेला. सिंह यांनी अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना आधी सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात खेचत सीबीआय चौकशीची मागणी केली. कोर्टात सिंह यांची याचिका फेटाळल्यात आली असली तरीही जयश्री पाटीलांची दखल याचिका मान्य करत 15 दिवसांत सीबीआय ला देशमुखांवरील आरोपांची प्रायमरी इंक्वायरी द्वारा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता सीबीआय पथक मुंबईत दाखल झाले असून सीबीआय चौकशीला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रिपदाचा राजीनामा, काय आहे संपूर्ण प्रकरण, वाचा सविस्तर.

दरम्यान आज सीबीआयने एनआयए कोर्टात सचिन वाझेच्या चौकशीच्या परवानगी साठी अर्ज दाखल केला होता तो आता मंजूर झाला आहे. सध्या सचिन वाझेच्या एनआयएच्या ताब्यात असून पोलिस खात्यामधून पुन्हा निलंबित झाला आहे.