मुंबई: सायन उड्डाणपूल दुरुस्ती कामाला आजपासून सुरुवात, वाहतूकीवर होणार परिणाम
त्यामुळे सायन मार्गावर वाहतुक कोडींचा परिणाम होणार असून नागरिकांना त्याचा त्रास पुढील दोन तास सहन करावा लागणार आहे.
मुंबईतील सायन उड्डाणपूलाचे (Sion Flyover Bridge) काम आजपासून सुरु होणार आहे. त्यामुळे सायन मार्गावर वाहतुक कोडींचा परिणाम होणार असून नागरिकांना त्याचा त्रास पुढील दोन तास सहन करावा लागणार आहे. तसेच पुलाच्या कामादरम्यान आठ ब्लॉक घेण्यात येणार आहेत. सायन उड्डाणपूलाचे बेअरिंग बदलण्यात येणार असून आठवड्यातील चार दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. सायन उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबई (IIT Mumbai) यांच्या तर्फे करण्यात आले होते. त्यानुसार पुलाचे बेअरिंग बदलण्यात यावे असे स्पष्ट करण्यात आले होते.
आज रात्री 10 वाजल्यापासून ते 17 फेब्रुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत सायन उड्डाण पुलावर पहिला ब्लॉक घेण्यात येणार आहे. सायन उड्डाण पुलावरुन मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा होत असते. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने उड्डाणपुलाचे महत्व लक्षात घेऊन त्याचे काम पूर्ण करण्याकडे आता लक्ष दिले जाणार आहे. या कामासाठी आठ ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच येत्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस याचे काम पूर्ण होणार असल्याचा अंदाज एमएसआरडीसीने व्यक्त केला आहे. पुलाच्या दुरुस्ती कामासाठी 6 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पुलाच्या बेअरिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर एक्सपानशन जॉइंट बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.(Mumbai Dangerous Bridge: नव्याने झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आढळले 15 धोकादायक पूल; जाणून घ्या यादी)