Mumbai Shocker: 35 वर्षीय तरूणीवर 75 वर्षाच्या व्यावसायिकाकडून बलात्कार; Dawood Ibrahim च्या नावाने धमकावल्याचा पीडीतेचा दावा
ते तो परत करत नव्हता. पीडीतेने जेव्हा त्याच्या विरूद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला ठार मारण्याच्याही धमक्या देण्यात आल्या.
जुहू (Juhu) मध्ये एका 35 वर्षीय महिलेवर 75 वर्षीय व्यावसियाकडून बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे पीडितेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या नावाने धमकावल्याचा आरोप तरूणीने केला आहे. सध्या या प्रकरणी मुंबई मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. MIDC पोलिसांनी याबाबत माहिती दिल्याचं ANI वृत्तसंस्थेकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान आरोपी व्यावसायिकाने मलिकेकडून 2कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. ते तो परत करत नव्हता. पीडीतेने जेव्हा त्याच्या विरूद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला ठार मारण्याच्याही धमक्या देण्यात आल्या. सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पीडीतेने दिलेल्या माहितीत जर ती पोलिसांकडे गेली तर तिला डी गॅंग कडून फोन येईल असे देखील सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. Rape: फेसबुकवर मैत्री करणे महिलेला पडले महागात, मुंबईत आर्थिक मदतीचे आश्वासन देत विवाहितेवर बलात्कार.
ANI Tweet
आरोपी व्यावसायिक दादर स्थित आहे. त्याने अनेकदा या तरूणीवर पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन अत्याचार केल्याचं म्हटलं आहे. महिलेने तक्रारीमध्ये दाऊदच्या नावाने धमकी दिल्याचा उल्लेख केल्याची माहिती आहे पण त्याची सत्यता पडताळण्यात येईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.