Mumbai Shocker: वसई मध्ये 17 वर्षीय मुलाची 3 मजली इमारतीच्या गच्चीतून उडी मारून आत्महत्या; तपास सुरू
क्लासला न जाता तो इमारतीच्या टेरेस वर पोहचला आणि तेथून त्याने उडी मारली.
मुंबई मधे एका 17 वर्षीय मुलाने 3 मजली इमारतीवरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं आहे. ही धक्कादायक घटना वसई मधील आहे. मिड डे च्या रिपोर्टनुसार ही घटना आज सोमवार 22 ऑगस्टच्या सकाळची आहे. खाजगी क्लासला जात असल्याचं सांगत तो सकाळी 7.30 ला बाहेर पडला. क्लासला न जाता तो इमारतीच्या टेरेस वर पोहचला आणि तेथून त्याने उडी मारली. आवाज ऐकताच आजूबाजूचे लोक बाहेर आले. तेव्हा त्यांनी मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं.
मुलाचा मृतदेह झाकून त्यांनी पोलिसांना बोलावलं. स्थानिकांनी मीडीयाला दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा अत्यंत चीअरफूल होता. आजुबाजूची लोकं, शेजारपाजार्यांशी तो आनंदाने बोलत होता. त्याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं असावं? हे गुढ त्याच्या कुटुंबियांना पडला आहे. नुकताच त्याने पार पडलेल्या दहीहंडी उत्सवामध्येही सहभाग घेतला होता. हे देखील नक्की वाचा: Ketaki Mategaonkar: गायिका केतकी माटेगावकर हिच्या चुलत भावाची आत्महत्या, बेकारीला कंटाळून टोकाचे पाऊल .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाचा मृतदेह ऑटोस्पी करण्यासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं तसेच तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. मृत मुलगा आई-बाबा आणि भावंडांसोबत इमारतीच्या तळ मजल्यावर राहत होता. ही घटना वसंत नगरी भागातील आहे.