Mumbai Shocker: सांताक्रूझमध्ये शाळेतील शिपायाचा 8 वर्षीय विद्यार्थिनीवर 3 महिने बलात्कार; आरोपीला अटक, गुन्हा दाखल
या ठिकाणी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा झाला. त्यानंतर भाभा रुग्णालयात तिच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या.
मुंबईमधून (Mumbai) बलात्काराचे (Rape) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथे शाळेतील एक शिपायाने तीन महिने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आठ वर्षांच्या विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी, सांताक्रूझ पोलिसांनी पश्चिम उपनगरातील एका शाळेत काम करणाऱ्या 39 वर्षीय शिपाईला अटक केली आहे. आरोपीने मुलीला धमकी दिलीं होती की, तिने ही जर ही बाब कोणाला सांगितली तर तो तिच्या पालकांना इजा करेल. म्हणूनच मुलगी 3 महिने शांत राहिली.
मात्र मुलीच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान आरोपीचे हे घृणास्पद कृत्य अखेर समोर आले. लोअर परळ येथील रहिवासी असलेल्या शिपायाची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीला चालण्यास त्रास होऊ लागल्यावर तिच्या पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले. या ठिकाणी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा झाला. त्यानंतर भाभा रुग्णालयात तिच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. तीन महिन्यांहून अधिक काळ, आरोपीने मुलीला शाळेच्या तळमजल्यावरील जिन्याच्या खाली असलेल्या एका स्टोअररूममध्ये कोंडून तिच्यावर बलात्कार केला होता. या ठिकाणी त्याने मुलीवर बलात्कारासह अनैसर्गिक लैंगिक अत्याचारही केले. 28 मार्च रोजी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आणि दोन दिवसांनी शिपायाला अटक करण्यात आली.
त्याच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम 6, 10 आणि 12 तसेच भारतीय दंड संहितेच्या तरतुदी 376, 377, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेतील इतर मुलांवरही असे अत्याचार झाले आहेत का, याचा पोलीस तपास करत आहेत. (हेही वाचा: Chhatrapati Sambhaji Nagar Crime: इन्स्टाग्रामवर मैत्री करून तरूणीवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी; दोघांना अटक)
दरम्यान, नुकतेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी एका कॅब चालकाला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी मानसिकदृष्ट्या आजारी होती आणि ड्रायव्हरने तिला बळजबरी करून तिच्यासोबत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. दादर पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी मोहम्मद जलील खलील (33) हा वडाळा येथे राहतो आणि उबेर कॅब चालवतो.