मुंबईमध्ये (Mumbai) बलात्काराचे (Rape) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने तिचे वडील आणि शेजाऱ्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. या मुलीने तिने तिच्या आईला घडलेला भयानक प्रकार त्यानंतर याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या एका 32 वर्षीय व्यक्तीने फेब्रुवारी 2023 मध्ये पीडितेच्या कुटुंबीयांना तो मुलीशी लग्न करण्यास इच्छुक असल्याबद्दल सांगितले. तेव्हापासून दोघांनीही एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला सुरुवात केली.
त्यानंतर या व्यक्तीने मुलीला आपल्या लैंगिक आवडीबद्दल सांगितले. नंतर त्याने मुलीवर बलात्कार करायला सुरुवात केली. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोप केला आहे की, 'नंतर लग्न करेन', असे म्हणत त्याने वारंवार तिच्यावर बलात्कार केला. मात्र, परिणामांच्या भीतीमुळे मुलगी या घटना तिच्या कुटुंबियांना सांगू शकली नाही.
त्याच महिन्यात 28 फेब्रुवारी रोजी पीडितेची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. घरात मुलगी आणि वडील दोघेच होते. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर वडिलांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे. त्यानंतर ती ही गोष्ट तिच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना सांगू शकली नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला जेव्हा ती गरोदर असल्याचे समजले तेव्हा तिने सर्व काही आपल्या आईला सांगितले. (हेही वाचा: Pune Shocker: भोसरी येथे पतीला जीवे मारण्याची धमकी देत गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार; 23 वर्षीय तरुणाला अटक, गुन्हा दाखल)
त्यानंतर लगेचच आई आणि मुलगी दोघींनीही टिळक नगर पोलीस ठाण्यात शेजारी आणि वडिलांविरुद्ध तक्रार नोंदवली. दोघांनाही पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली, त्यांनी चौकशीत गुन्ह्यांची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. या दोघांविरुद्ध कलम 376 (बलात्कार), 376 (2) (एफ) (नातेवाईक, पालक किंवा महिलेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीकडून तिच्यावर बलात्कार), 376 (2) (j), तसेच भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 च्या कलम 4 (पेनिट्रेटिव्ह लैंगिक अत्याचार), 6, 8, 2 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.