Mumbai Shocker: आजारपणाला कंटाळून वयोवृद्धाने पत्नीवर केले चाकूचे वार, स्वतःचंही आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पण कालांतराने त्यांची आणि त्यांच्या पत्नीची तब्येत खालावत गेली. आजारपणाला कंटाळूनच त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता
मुंबई मध्ये एका हत्याकांडाने शहर हादरलं आहे. एका वयोवृद्धाने आपल्या रूग्णशय्येवर असलेल्या पत्नीवर हल्ला करून जीव घेतला आहे. ही घटना कांदिवली मधील आहे. आरोपीचं नाव Vishnukant Ballur आहे. Vishnukant Ballur ने स्वयंपाकघरातील चाकूने पत्नीवर 8 वेळा हल्ला केला आहे. त्यानंतर त्याने स्वतःचा देखील जीव घेण्याचा प्रयत्न केला. शनिवार (26 ऑगस्ट) च्या सकाळची ही घटना आहे. आरोपीला खूनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्ट्स नुसार, कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेज मध्ये हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी आरोपीवर हल्ल्याचा आरोप केला आहे. आयुष्याला कंटाळलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या दोन्ही वृद्ध दांपत्यांना मधुमेहाचा त्रास होता. आरोपी काठीचा आधार घेत चालत होते. तर अनेक वर्ष पत्नी रूग्णशय्येवर होती.
दरम्यान हाऊस हेल्प करणार्या व्यक्तीनंतर आरोपी स्वतःच्या आजारपणातही पत्नीची काळजी घेत होती. पत्नीनंतर त्यांनी स्वतःवर देखील हल्ला केला आहे. पण त्यांचे घाव खोल नव्हते. घरात काम करणार्या महिलेला जेव्हा घराचा दरवाजा आतून बंद झालेला जाणवलं तेव्हा हा प्रकार प्रकाश झोतात आला. आरोपीने काही वेळाने दरवाजा उघडला आणि त्यांनी महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर दोघांनाही रूग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनाही कळवण्यात आले.
महिलेच्या पाठीवर, डोक्याला गंभीर दुखापती होत्या. आता ती उपचारानंतर धोक्याच्या बाहेर आहे. आरोपीने आपल्याला जीवन संपवायचं होतं पण आपल्यानंतर पत्नीला कोण बघणार? ही चिंता सतावत होती म्हणून पहिलं पत्नीला मारल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या जोडप्याचा मुलगा 27 वर्ष परदेशात राहत आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे अद्याप अटक झालेली नाही.
Vishnukant हे एका मल्टिनॅशनल कंपनीचे 20 वर्ष CEO होते. पण कालांतराने त्यांची आणि त्यांच्या पत्नीची तब्येत खालावत गेली. आजारपणाला कंटाळूनच त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता असं समता नगर पोलिस स्टेशनच्या ऑफिसरने म्हटलं आहे.