Mumbai Shocker: मानखुर्द च्या नाल्यात आढळला प्लॅस्टिक बॅगेत भरलेला महिलेचा मृतदेह

त्याने तातडीने नजीकच्या पोलिस स्टेशन मध्ये त्याची माहिती दिली.

Death (Photo Credits-Facebook)

मुंबई (Mumbai) मध्ये एका महिलेचा मृतदेह प्लॅस्टिकच्या बॅग मध्ये भरून मानखुर्द (Mankhurd) भागात नाल्यात सापडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांना या महिलेची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज (23 ऑगस्ट) पोलिसांनी त्याबाबतची माहिती दिली आहे. काल एका व्यक्तीला मानखुर्दच्या झाकीर हुसेन नगर (Zakir Hussain Nagar) मध्ये नाल्याच्या जवळून जाताना बॅग पडलेली दिसली. त्याने तातडीने नजीकच्या पोलिस स्टेशन मध्ये त्याची माहिती दिली.

पोलिसांनी जेव्हा ही बॅग उघडली तेव्हा त्यांना या बॅगेमध्ये 25-30 वर्षाच्या एका महिलेचा मृतदेह आढळला. यावेळेस महिलेचे हात पाय बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळले. पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र आढळले तर हातात बांगड्या आणि इतर काही वस्तू देखील होत्या. (नक्की वाचा: Nalasopara Shocker: नालासोपारा मध्ये ज्वेलरची दिवसा ढवळ्या निर्घुण हत्या).

पोलिसांकडून या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासलं जात आहे. सोबतच व्यक्ती गायब असल्याची कोणती तक्रार समोर आली आहे का? हे देखील तपासलं जात आहे.

पोलिस स्टेशन मध्ये दाखल FIR मध्ये IPC 302,201 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा अज्ञात व्यक्ती विरूद्ध दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.