Mumbai Shocker: वांद्रे येथील हाय-प्रोफाइल त्वचारोगतज्ज्ञ Dr Ruby Tandon हिला अटक; बनावट पदवीच्या आधारे करत होती उपचार
बीएमसीच्या चौकशीदरम्यान डॉ टंडन हिची मुंबईतील महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे कोणतीही नोंदणी नसल्याचे आढळून आले. वांद्रे पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप केरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आणि बीएमसी अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने क्लिनिकला भेट दिली आणि तिची आणि तिच्या पतीची चौकशी केली.
वांद्रे पोलिसांनी शुक्रवारी एका हाय-प्रोफाइल त्वचारोगतज्ज्ञ डॉ. रुबी टंडनला अटक केली. व्यवसाय करण्यासाठी बनावट पदवी प्रमाणपत्र मिळवल्याच्या आरोपाखाली रुबीला अटक केली आहे. डॉ. टंडन हिला शनिवारी न्यायालयात हजर केले गेले. डॉ टंडन हिचे शिफा वेलनेस क्लिनिक हे 198, लिंकिंग रोड, वांद्रे पश्चिम येथे कार्यरत होते. तिने अभिनेता अमित टंडनशी लग्न केले आहे आणि अनेक सेलिब्रिटी तिचे क्लायंट आहेत. वांद्रे पोलिसांनी तिला 19 ऑक्टोबर रोजी बोलावले आणि त्यानंतर तपासादरम्यान तिने पोलिसांना दिलेली प्रमाणपत्रे बनावट असल्याचे आढळले. त्यानंतर तिला अटक केली गेली.
वांद्रे पोलिसांना एका निनावी स्त्रोताकडून लेखी तक्रार प्राप्त झाली होती, ज्यात दावा केला होता की, डॉ टंडनची पदवी बनावट आहे आणि त्याबाबत पुढील तपास करणे आवश्यक आहे. पोलिसांनी ही तक्रार खारच्या एच/वेस्ट वॉर्डमधील बीएमसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक चव्हाण यांच्याकडे पाठवली. त्यानंतर डॉ.चव्हाण आणि त्यांच्या टीमने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलशी संपर्क साधला.
बीएमसीच्या चौकशीदरम्यान डॉ टंडन हिची मुंबईतील महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे कोणतीही नोंदणी नसल्याचे आढळून आले. वांद्रे पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप केरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आणि बीएमसी अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने क्लिनिकला भेट दिली आणि तिची आणि तिच्या पतीची चौकशी केली. तिच्याकडे पदवी प्रमाणपत्राची मागणी केली असता, तिने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नोंदणी प्रमाणपत्राची कलर प्रिंटआउट आणि मेडिकल कौन्सिलचा परवाना सादर केला. या प्रमाणपत्रांमध्ये डॉ रुपिंदर धालीवाल आणि रुपिंदर टंडन जगत धालीवाल यांची नावे होती. (हेही वाचा: Mumbai AQI: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली; BMC सक्रीय, प्रदुषण नियंत्रणासाठी उपाययोजना सुरु)
पोलिसांनी प्रमाणपत्रांवरील भिन्न नावांबद्दल चौकशी केली तेव्हा टंडनने स्पष्ट केले की तिचे लग्नापूर्वीचे आडनाव धालीवाल होते. मात्र जारी करणार्या संस्थेच्या वेबसाइटवर पडताळणी केल्यावर, बीएमसी अधिकार्यांना संबंधित नोंदी आढळल्या नाहीत. त्यानंतर डॉ. चव्हाण यांनी वांद्रे पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली, परिणामी भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम 1961 च्या इतर कलमांखाली प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला.
(The above story first appeared on LatestLY on Oct 21, 2023 06:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

