Mumbai Shocker: माहीम बीचवर अज्ञातांच्या हल्ल्यात 30 वर्षीय व्यक्तीचा खून; तरूणी जखमी

मुंबई च्या माहीम बीचवर (Mahim Beach) मंगळवार (1 फेब्रुवारी) दिवशी एका 30 वर्षाच्या व्यक्तीचा खून करण्यात आला असून त्याच्या 22 वर्षीय मैत्रिणीवर गंभीर हल्ला झाला आहे. मंगळवारी रात्री हे जोडपं बीचवर बसलेलं असताना त्यांच्यावर 2 अज्ञातांकडून हल्ला झाला.

Mahim Beach (Photo Credits-IANS)

मुंबई च्या माहीम बीचवर (Mahim Beach) मंगळवार (1 फेब्रुवारी) दिवशी एका 30 वर्षाच्या व्यक्तीचा खून करण्यात आला असून त्याच्या 22 वर्षीय मैत्रिणीवर गंभीर हल्ला झाला आहे. मंगळवारी रात्री हे जोडपं बीचवर बसलेलं असताना त्यांच्यावर 2 अज्ञातांकडून हल्ला झाला. पोलिसांना अद्याप त्यांच्यावरील हल्ल्याचं कारण समजू शकलेलं नाही. पण पोलिसांना अंदाज आहे की मारेकर्‍यांना मृत व्यक्ती ओळखीची होती. मृत व्यक्तीचं नाव मोहम्मद वासिम शेख आहे. तो आणि त्याची मैत्रिण शिवाजी नगर, गोवंडी चे रहिवासी आहेत. पोलिसांनी मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर अंतर्गत केस दाखल केली आहे. दरम्यान जखमी तरूणीने केलेल्या वर्णनावरून सध्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त TOI ने दिले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शेख आणि त्याची मैत्रिण माहीम च्या एका देवस्थानाला भेट देऊन बीचवर आले होते. माहिमच्या ज्या भागात हे जोडपं बसलं होतं तो भाग निर्मनुष्य असतो. तसेच गर्दुल्यांचा तिथे वावर असतो. तरूणीने जबाबामध्ये दिलेल्या माहितीमध्ये ते बीचवर असताना अचानक दोन जणं आली आणि मारहाण करायला लागली. शेखने त्यांना विचारलं असता त्यालाही मारायला सुरूवात केली. जखमी तरूणी तेथून पळ काढण्यात यशस्वी ठरली. नंतर जखमी अवस्थेमध्येच तिला वांद्रे येथील भाभा हॉस्पिटल मध्ये दाखल केले. नंतर हॉस्पिटलने पोलिसांना ही माहिती दिली. भाभा हॉस्पिटल मधून तरूणीला पुढे सायन हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले.

तरूणीच्या जबाबानंतर पोलिस माहिम बीचवर पोहचले तेव्हा त्यांना शेख मृतावस्थेमध्ये आढळला. दरम्यान शेख नुकताच दुबई मधील टॅक्सी ड्रायव्हरचा जॉब सोडून भारतामध्ये परतला होता. त्याच्या पश्चात 4 बहिणी आणि वृद्ध आई आहे. Dapoli Shocker: दापोली मधील तीन महिलांच्या हत्याकांडाचा पोलिसांकडून 10 दिवसात छडा; आरोपी अटकेत. 

सध्या पोलिस या प्रकरणामध्ये लव्ह अ‍ॅंगलनेही तपास करत आहेत. सध्या माहिमवासियांकडून बीचवर मोठया प्रमाणात पोलिस वाढवण्याची मागणी होत आहे. या भागातील ड्रग अ‍ॅडिक्स रात्री बीचलाच त्यांचं घर बनवतात. वरळी ते माहीम या भागात गर्दुले अधिक आहेत. या ठिकाणी असलेली प्रार्थनास्थळं आणि तेथील भाविक गोर गरिबांना अन्न वाटप करतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement