Mumbai Shocker: रोखून पाहिल्याच्या रागात 28 वर्षीय तरूणाची माटुंगा परिसरात हत्या; 3 आरोपी अटकेत

कलम 302, 504, आणि 506 अंतर्गत आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Mumbai Shocker: रोखून पाहिल्याच्या रागात 28 वर्षीय तरूणाची माटुंगा परिसरात हत्या; 3 आरोपी अटकेत
Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai)  मध्ये माटुंगा (Matunga) परिसरामध्ये एका 28 वर्षीय तरूणाची हत्या केल्या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. 'स्टेअरिंग' (staring) अर्थात या तीन जणांपैकी एका रोखून बघितल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादाचा शेवट हत्ये सारख्या गंभीर गुन्ह्यात झाल्याने खळबळ पसरली आहे. रविवार 23 ऑक्टोबरच्या सकाळी मांटुगा मध्ये एका रेस्टॉरंट जवळ हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे.

मृत मुलगा त्याच्या मित्रासोबत तेथे गेला होता. त्याचं आरोपींसोबत नजर रोखून पाहिल्याच्या कारणावरून भांडण झालं. आरोपीने त्याच्या डोक्यावर बेल्टने मारलं. त्यानंतर त्याला किक आणि पंच मारून जबर मारहाण केल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

पहा ट्वीट

मारहाणीनंतर तो मुलगा जागीच कोसळला. त्याला जवळच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले पण तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. शाहू नगर पोलिस स्थानकामध्ये सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामध्ये विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये कलम 302, 504, आणि 506 अंतर्गत देखील गुन्हे दाखल आहेत. हे देखील नक्की वाचा: Crime: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने चहावाल्याची हत्या, आरोपी अटकेत.

मुंबई पोलिसांकडून आज आरोपींना कोर्टात दाखल केले जाणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 24, 2022 02:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).