Mumbai Shocker: खार मध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या तरूणीला स्टॉक केल्याप्रकरणी 24 वर्षीय तरूण अटकेत

मुंबई पोलिसांनी बुधवारी एका व्यक्तीला 21 तरूणीला स्टॉक केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे.

Representational Picture. Credits: Pixabay

मुंबई पोलिसांनी बुधवारी एका व्यक्तीला 21 तरूणीला स्टॉक केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मॉर्निंग वॉक साठी आलेली असताना मागील महिन्यात तिला दोन तास स्टॉक केल्याचा आरोप एका 24 वर्षीय व्यक्तीवर करण्यात आला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार ही घटना 26 मार्चची आहे. पहाटे 5.30 वाजता तिने घर आणि चएच सोडलं तेव्हा तिच्यासोबत हा प्रकार घडला.

तरूणीने एक बायकर तिच्यावर पाळत ठेवून असल्याचं निदर्शनास आलं. तिने दुर्लक्ष करत पुढे चालत राहण्याचा निर्णय घेतला. पुन्हा तिला कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून असल्याचं दिसलं. मग तिने 2 किमी वर असलेल्या मेडिकल स्टोअर मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. बाहेर पडल्यावर तिक्ला परत तिला तोच व्यक्ती दिसला. मग तिने बाईकचा नंबर नोट करून घेत रिक्षाने घरी जाण्याचा निर्णय घेतला.

सकाळी पुन्हा 7.20 च्या सुमारास ती घराबाहेर पडली तेव्हा तो व्यक्ती बाईकावर बसलेला दिसला. जसा तिने पोलिस कंट्रोल रूमला कळवण्यासाठी फोन केला तसा तो पळून गेला. नक्की वाचा: महिलांना आहेत हे '8' खास अधिकार!

सीसीटीव्ही फूटेजवरून कोणतीच माहिती मिळाली नव्हती पण बाईक रजिस्ट्रेशन नंबर वरून मात्र माहिती काढण्याचा प्रयत्न करताछ मालकाचा पत्ता लागला. मालक गुजरातचा होता. तेव्हा त्याने सागर चव्हाण नावाच्या व्यक्तीला गाडी 10 हजार रूपयांना विकल्याचं सांगितलं. मग पोलिसांनी सागरला अटक केली आणि कोर्टात हजर केले. स्टॉकिंग हा जामीनपात्र गुन्हा असल्याने त्याची दहा हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका झाली आहे.

दरम्यान आता महिला सुरक्षेसाठी निर्भया स्कॉड तैनात करण्यात आलं आहे. 100 किंवा 103 या क्रमांकावर महिलांनी पोलिसांकडे मदत मागितल्यास त्यांच्या सुरक्षेसाठी स्कॉड पोहचणार आहे. बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीने त्यासाठी खास व्हिडिओ बनवला आहे.