Mumbai Shocker: गोवंडी मध्ये फटाके उडवण्यावरून वादातून एकावर चाकू हल्ला; आरोपी 2 भाऊ अटकेत

खूनाच्या प्रयत्नामध्ये दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पीडीत मुलाअवर शताब्दी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

हल्ला | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मुंबई मध्ये फटाके उडवण्याच्या भांडणावरून गोवंडी (Govandi) मध्ये एका 22 वर्षीय मुलावर हल्ला आणि त्याच्या मित्रांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन भावंडांनी हा हल्ला केला आहे. पोलिसांनी निलेश भालेराव आणि निखिल यांना अटक केली आहे. निलेशची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. यापूर्वीदेखील त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचे आरोप झाले आहेत.कोपरखैरणे पोलिस स्थानकामध्ये त्याच्या विरूद्ध गुन्हे दाखल आहेत. आताही या प्रकरणाच्या वेळेस तो जामीनावर बाहेर आला होता.

टाईम्स ऑफ इंडिया च्या रिपोर्टनुसार, रविवारी दिवाळीच्या रात्री Ganesh Chithalwad त्याच्या मित्रांसोबत फटाके एंजॉय करत होता. अशा वेळी त्याच्या शेजारी बसलेले दोन भाऊ त्यांच्यावर खूप आवाज करत असल्याने ओरडले. वाद पेटला आणि निलेशने त्याच्या मागे आवाज करणार्‍या गणेशला मारण्यासाठी सुरा दिला. त्याचा वार छातीवर आणि गळ्याजवळ झाला. गणेशवर वर वार झाल्यानंतर 3 जण त्याच्या मदतीला धावून आले. आजुबाजूला असलेल्यांनी सारा प्रकार पाहून पोलिसांना बोलावलं. पण त्या हल्लेखोर भावांनी तेथून पळ काढला.

पीडित मुलाच्या मित्राने पोलिसांत स्टेंटमेंट दिल्यानंतर आरोपीला घरातून अटक करण्यात आली. खूनाच्या प्रयत्नामध्ये दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पीडीत मुलावर शताब्दी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. Maharashtra AQI and Air Pollution: निसर्गाने दिले, फटाक्यांमुळे गमावले; महाराष्ट्रात हवेची गुणवत्ता खालावली, नागरिकांना आरोग्याच्या समस्या .

काही दिवसांपूर्वी असाच विक्रोळीच्या कन्नमवार भागात एका महिला सामाजिक कार्यकर्तीवर हल्ला झाला. रस्त्यात फटाके उडवण्यावरून वाद झाला आणि रिक्षातून पोलिस स्टेशनला जात असताना त्या व्यक्तीने महिलेचे डोके आपटले आणि तो रिक्षातून पसार झाला.