Mumbai Shocker: लेकीच्या अपहरणाची तक्रार घेऊन आला बाप अन त्याच्याच कूकर्माचा झाला उलगडा; पोटच्या लेकीवर 5 वर्ष करत होता लैंगिक अत्याचार

सातरस्ता भागात वडील सापडल्यानंतर त्यांनी अटक केली.

Representative Image

मुंबई मध्ये 46 वर्षीय बापाने त्याच्या तरूण मुलीच्या किडनॅपिंगची (Kidnapping) पोलिसांत तक्रार केली पण यामध्ये त्यानेच पोटच्या पोरीवर 5 वर्ष लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. त्याच्या विरूद्ध Bharatiya Nyaya Sanhita आणि POCSO Act अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 वर्षीय मुलगी बापाच्या अत्याचाराला कंटाळून पळून गेली होती.

मुंबई मध्ये महालक्ष्मी भागात ही मुलगी राहत होती. दरम्यान मुलगी घरी न आल्याने बापाने ताडदेव पोलिस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार केली. आपल्या मुलीचं अपहरण झाल्याची त्याने तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाची केस नोंदवून घेतली. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर मुलगी महालक्ष्मी स्टेशन वर सापडली. त्यानंतर तिला पोलिसांनी क्राईम ब्रांच ऑफिस मध्ये आणले. तिच्याकडून माहिती घेतल्यानंतर तिने आपल्या वडिलांकडूनच अत्याचार होत असल्याचं म्हटलं आहे. मागील 5 वर्षांपासून त्रास होत असल्याचं ती म्हणाली. मुलीच्या जबाबावरून आरोपी बापाविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नक्की वाचा: Pune Shocker: अश्लील व्हिडिओ दाखवून स्वतःच्या 11 वर्षीय मुलीवर बलात्कार; आरोपी वडिलाला अटक, पुण्यातील धक्कादायक घटना.

Police Inspector Sadanand Yerekar यांच्या नेतृत्त्वाखाली क्राईम ब्रांच टीमने आरोपी बापाचा शोध सुरू केला. सातरस्ता भागात वडील सापडल्यानंतर त्यांनी अटक केली. आरोपीची मेडिकल टेस्ट करण्यात आली आणि त्याची रवानगी ताडदेव पोलिसांकडे करण्यात आली. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif