Mumbai Shocker: कुर्ला मध्ये 14 वर्षीय मुलाला एकाच वेळी Dengue, Malaria, Leptospirosis ची लागण; उपचारादरम्यान मृत्यू

Girish Rajadhyaksha, the head of the medicine unit and a professor,यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंनफेक्शन वर मात करण्यासोबतच वाढणारी लक्षणं आणि मल्टि ऑर्गन फेल्युअर वर मात करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते मात्र ते अपयशी ठरले.

Dead-pixabay

मुंबई मध्ये एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू डेंगी, मलेरिया आणि लेप्टो या तिन्ही आजारांची लागण झाल्यानंतर उपचारादरम्यान झाला आहे. दरम्यान या आजारपणामध्ये या मुलावर सुरूवातील भोंदू बाबा कडून उपचार करण्यात आले. काही दिवसांनंतर त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कुर्ला मध्ये राहणारा हा किशोरवयीन मुलगा 14 ऑगस्टला कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये आला होता. ताप आणि काविळ झाल्याचं त्यावेळी सांगितलं होतं.

रिपोर्ट्सनुसार, मुलावर भोंदू बाबा ने उपचार केल्यानंतर परिस्थिती सुधारत नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने वैद्यकीय उपचार हॉस्पिटल मध्ये घेण्याचा निर्णय घेतला. कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर त्याच्या काही टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये dengue NS1 test पॉझिटिव्ह आली. सोबतच मलेरियाचे देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. या मुलाच्या त्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत leptospirosis ची देखील लागण झाली असल्याचं समोर आलं आहे.

14 वर्षीय या मुलाची creatinine levels वाढल्याने त्याला हळूहळू श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्याला नायर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागातच त्याचा मृत्यू झाला. मलेरिया, लेप्टो आणि डेंगी अशा तीन आजाराचा एकाच वेळी मारा झाल्याने त्याची श्वसन यंत्रणा कमकुवत झाली. व्हेंटिलेटर वर असलेल्या अवस्थेतच त्याचा तीन दिवसांमध्ये BYL Nair Hospital मध्ये मृत्यू झाला.

Dr. Girish Rajadhyaksha, the head of the medicine unit and a professor,यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंनफेक्शन वर मात करण्यासोबतच वाढणारी लक्षणं आणि मल्टि ऑर्गन फेल्युअर वर मात करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते मात्र ते अपयशी ठरले.