Mumbai Shocker: मीरा भाईंदर मध्ये 13 वर्षीय मुलीचा विनयभंग, इस्लाम धर्मात जाण्यासाठी धमकावल्याची तक्रार; 2 जण अटकेत
1 जून पासून आरोपी पीडीतेला ती घरातून शाळेत, क्लास मध्ये जात असताना विचित्र हावभाव करून दाखवत होते.
भायंदर पोलिसांनी 2 तरूणांना अटक केली आहे. 13 वर्षीय मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणामध्ये या तरूणांवर मुलीला बुरखा घालून इस्लाम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती केली जात असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. अटक केलेल्या 2 तरूणांची नावं Munnawar Mansuri आणि Azim Mansuri आहेत. या दोघांचीही वयं 20 वर्ष आहेत. पीडीत मुलीच्या आईने याबाबत तक्रार केली होती त्यावरून दोघांना अटक झाल्याची माहिती Jayant Bajbale, deputy commissioner of police, Zone 1 of Mira-Bhayander-Vasai-Virar police commissionerate यांनी दिली आहे.
पोलिसांनी बुरखा आणि फेक पिस्तुल देखील जप्त केली आहे. या फेक बंदूकीच्या आधारेच त्या मुलीला धमकवण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे. मुलीच्या कुटुंबियांचे आणि स्थानिकांचे जबाब नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी असे देखील सांगितले आहे की आरोपी पीडीतेला ती घरातून शाळेत, क्लास मध्ये जात असताना विचित्र हावभाव करून दाखवत होते. हा प्रकार 1 जून पासून सुरू होता.
मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले की, 13 जून रोजी मुन्नावरने तिच्या मुलीला जबरदस्तीने त्यांच्या इमारतीच्या टेरेसवर नेले आणि तिचा विनयभंग केला. मुलगी रडायला लागल्यावर मुन्नावरने तिला बुरखा, सोन्याची चेन आणि अंगठी दिली आणि ती घालायला सांगितली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुन्नावरने मुलीला सांगितले की ते पळून जाऊन लग्न करणार आहेत.