Loksabha Election 2014: खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना तुरुंगवासाची शिक्षा
के. गुदाधे यांनी आरोपींवरील सर्व आरोपांपैकी हत्येच्या आरोपातून आरोपींची सुटका केली आहे. तर, आरोपींना आपणास झालेल्या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील करता यावे यासाठी सर्व आरोपींना जामीनही मंजूर केला आहे. एबीपी माझाय या वृत्तवाहिणीने याबात वृत्त दिले आहे.
Loksabha Elections: मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (Shivsena) पक्षाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे(MP Rahul Shewale) यांच्या पत्नी कामिनी शेवाळे ( Kamini Shewale)यांना एक वर्ष तुरुंगवास शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. लोकसभा निवडणूक २०१४ (Loksabha Election 2014) मध्ये शिवसेना आणि मनसे (MNS) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. या वेळी जमावाने एका पोलीस हवालदार विकास थोरबोले (Vikas Thorbale) यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी न्यायालयात खटला सुरु होता.
दरम्यान, राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी आणि त्यांच्यासोबत इतरही 17 जणांना एक वर्ष तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावली आहे. मात्र, तूर्तास तरी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना आणि मनसे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. निवडणूक कालावधीत पैसे वाटल्याच्या आरोपावरुन मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जारदार बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर पुढे मोठे भांडण आणि जमावाच्या हाणामारीत झाले होते. या वेळी कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार विकास थोरबोले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, दोन्ही जमावाती एका गटाने शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या विकास थोरबोले यांना बेदम मारहाण केली. यात थोरबोलो गंभीर जखमी झाले. या प्रकरणी राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी आणि इतर १७ जाणांव भारतीय दंड संहिता कलम 149 आणि 427 ( मारहाण, हत्येचा प्रयत्न आणि जमावबंदीचे उल्लंघन) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा, पुलवामा हल्ल्या प्रकरणी केलेल्या वक्तव्यावरुन राज ठाकरे यांची सीआयडी चौकशी करण्याची मागणी; उच्च न्यायालयात याचिका दाखल)
दरम्यान, मुंबई सत्र न्यायालय न्यायादीश डी. के. गुदाधे यांनी आरोपींवरील सर्व आरोपांपैकी हत्येच्या आरोपातून आरोपींची सुटका केली आहे. तर, आरोपींना आपणास झालेल्या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील करता यावे यासाठी सर्व आरोपींना जामीनही मंजूर केला आहे. एबीपी माझाय या वृत्तवाहिणीने याबात वृत्त दिले आहे.