मुंबई: आईस्क्रीमच्या खरेदीवर ग्राहकांकडून 10 रुपये अधिक घेतल्याने एका रेस्टॉरंटला 2 लाखांचा दंड
आईसक्रीमच्या खरेदीवर ग्राहकांकडून 10 रुपये अधिक घेतल्याने मुंबईतील (Mumbai) शगुन व्हेज रेस्टॉरंटला (Shagun Restaurant) दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाने (South Mumbai District Consumer Disputes Redressal Forum) 2 लाखांचा दंड ठोठवला आहे.
आईसक्रीमच्या खरेदीवर ग्राहकांकडून 10 रुपये अधिक घेतल्याने मुंबईतील (Mumbai) शगुन व्हेज रेस्टॉरंटला (Shagun Restaurant) दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाने (South Mumbai District Consumer Disputes Redressal Forum) 2 लाखांचा दंड ठोठवला आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकास नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित रेस्टॉरंटला गेल्या 24 वर्षांपासून दररोज 50 हजाराच्या जवळपास उत्पन्न होत आहे. एमआरपीपेक्षा अधिक शुल्क आकारून रेस्टॉरंटने अधिक नफा कमवला आहे, हे स्पष्ट झाले आहे. तसेच ग्राहकांची फसवणूक करून रेस्टॉरंट आणि दुकानांच्यावतीने व्यवसाय करणे योग्य नाही, असे जिल्हा ग्राहक पंचायतीने म्हंटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उप निरिक्षक भास्कर जाधव यांनी 8 जून 2014 रोजी रात्री डीबी मार्ग पोलीस ठाण्यातून आपल्या घरी जात होते. मात्र, रस्त्यातून जात असताना त्यांनी आपल्या कुटुंबासाठी शगुन रेस्टॉरंटमधून आईसक्रीमचे 2 फॅमिली पॅक खरेदी केले होते. त्यावेळी त्यांच्याकडून 165 रुपयांऐवजी 175 रुपये घेतले होते. मात्र, भास्कर जाधव यांनी अधिक शुल्क आकरल्याचा विरोध केला. परंत, त्यांचे कोणीच ऐकले नाही. यामुळे भास्कर यांनी दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाकडे तक्रार केली होती. हे देखील वाचा- पुणे: फक्त रिक्षाचालकांंचे मोबाईल चोरायचा भुरटा चोर, पोलिसांनी अटक करताच दिलं 'हे' विचित्र कारण
महत्वाचे म्हणजे, भास्कर यांनी आईसक्रीम रेस्टॉरंटच्या आत न जाता काउंटरमधून खरेदी केली होती. तरी देखील त्यांच्याकडून अधिक शुल्क आकारले गेले. रेस्टॉरंटने आपल्या प्रतिक्रियेत असे सांगितले की, आईसक्रीम थंड ठेवण्यासाठी आम्ही ग्राहकांकडून अतिरिक्त 10 रुपये आकारले होते. यावर दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाने स्पष्टीकरण दिले आहे. ग्राहक जाधव यांनी रेस्टॉरंटमधील वेटरकडून पाणी मागितले किंवा एसीसारख्या इतर कोणत्याही सेवेचा लाभ घेतला नाही. अशा ग्राहकांकडून अधिक शुल्क आकारणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.