Mumbai Rains: मुंबईत विक्रमी पाऊस, 24 तासांमध्ये 204 मिमी पावसाची नोंद

पहिल्यांदा 2 जुलै 2019 रोजी 375.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.

Mumbai Rain | Twitter

मुंबईसह (Mumbai) ठाणे, (Thane) कल्याण (Kalyan) या भागांमध्ये मागील 24 तासांमध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सांताक्रूझ वेधशाळेने मुंबईसह उपनगरात 204 मिमी पाऊस बरसला असल्याची नोंद केली आहे. या वर्षातील ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे. तर मागील नऊ वर्षात तिसऱ्यांदा जुलै महिन्यात (July Month) चोवीस तासांमध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई आणि परिसरात अद्यापही पावसाची संततधार ही सुरु आहे. पावसाच्या या जोरदार बॅटिंगमुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.   (हेही वाचा - Weather Forecast: राज्यात मुसळधार पाऊस, पुढचे 48 तास महत्त्वाचे)

या आधी मुंबईसह उपनगरांमध्ये दोन वेळा जुलै महिन्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पहिल्यांदा 2 जुलै 2019 रोजी 375.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर 16 जुलै 2021 रोजी 4 तासांत 253.3 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. तसेच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणांतील पाणीसाठा 42.75 टक्क्यांवरुन 47.5 टक्क्यांपर्यंत वाढला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या ठाणे वेधशाळेने मुंबईसह पालघरला अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईला हवामान विभागने यलो अलर्ट तर पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.  शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर वसईमध्ये सखल भागामध्ये पाणी साचले होते. तर जलसाठा कायम होता. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी देखील अडचण निर्माण झाली होती.