Mumbai Rains: पावसामुळे कांदिवलीच्या पश्चिम एक्सप्रेस हायवेवर दरड कोसळल्याची घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा Video

कांदिवली येथे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहून शकतो की, रस्त्यावरील वाहतूक सुरु असताना अचानक डोंगराचा काही भाग रस्त्यावर पडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भूस्खलन (Photo Credit: Twitter Video Screengrab)

Landslide on Western Express Highway: मुंबई (Mumbai) आणि नजीकच्या जिल्ह्यात रात्रीपासून होणाऱ्या पावसाचा फटाका वाहतुकीला बसला आहे. रेल्वे रुळांवर आणि सखोल भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. या दरम्यान, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर (Western-Express Highway) दरड कोसळल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. कांदिवली (Kandivali) येथे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळली. डोंगराचा काही भाग रस्त्या समोरच कोसळला असून विजेचा खांबही कोसळला, ज्यामुळे संपूर्ण मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने मीरारोडहून मुंबईला येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मात्र, वाहन चालकांना दिलासा म्हणजे मुंबईहून मीरारोडला जाणारा मार्ग सुरु आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहून शकतो की, रस्त्यावरील वाहतूक सुरु असताना अचानक डोंगराचा काही भाग रस्त्यावर पडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, सध्या दरड हटवण्याचे काम सुरु आहे. (Mumbai Rains Traffic Update: मुंबईत पावसाचे पाणी साचल्याने हिंदमाता, अंधेरी, मालाड सहित 'या' ठिकाणी वाहतुक बंंद)

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईच्या अनेक संकल भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. तसेच रेल्वे रुळावरही पाणी भरल्याने पश्चिम आणि हार्बर रेल्वे ठप्प झाली असून मध्य रेल्वेवरील वाहतूक धीम्यागतीने सुरु आहे. मुंबईमधील दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. दुसरीकडे, हवामान खात्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई रायगड या भागात रेड अलर्ट जाहीर केला आहे. आज 4 ऑगस्ट आणि बुधवार 5 ऑगस्ट रोजी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पाहा पश्चिम एक्सप्रेस हायवेवरील दरड कोसळल्याचा हा व्हिडिओ

पावसामुळे मुंबई शहर व उपनगरातील विविध भागातील 8 मार्गांवर BEST बस सेवा वळवण्यात आल्या आहेत. दादर आणि प्रभादेवी येथे मुसळधार पावसामुळे विरार-अंधेरी-वांद्रे व वांद्रे-चर्चगेट दरम्यान लोकल सेवा निलंबित करण्यात आली आहे, तर हार्बर मार्गावर सुद्धा लोकलची वाहतुक कोलमडली असूनमध्य रेल्वेवरील वाहतूक धीम्यागतीने सुरु आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif