Mumbai Rains Forecast: मुंबईमध्ये आज दमदार सरी कोसळण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

हा ऑगस्टमधील गेल्या 10 वर्षांतील 24 तासांमधील सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचा पाऊस असल्याची माहिती देण्यात आली आहे. आजही मुंबईत काही ठिकाणी दमदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

5 August Mumbai Rain Updates:  मुंबईमध्ये शुक्रवार (2 ऑगस्ट) च्या रात्रीपासून धुव्वाधार पावसाने मुंबई, ठाणे, कोकण,पालघर भागाला झोडपून काढले आहे. आता हवामान खात्याने आज (5 ऑगस्ट) दिवशी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. मुंबई सह उपनगरामध्ये पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरीही सकाळच्या वेळेस आज पावसाने विश्रांती घेतली आहे. मागील दोन दिवसांपासून कोसळणार्‍या पावसामुळे मुंबईत रस्ते आणि रेल्वे वाहतूकही कोलमडली आहे. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. ठाणे: परिसरात सतर्कतेचा इशारा; अतिवृष्टीमुळे उद्या जिल्ह्यातील शाळा-कॉलेज बंद, शासकीय सुट्टी जाहीर

रविवारी मुंबईमध्ये 204 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला. हा ऑगस्टमधील गेल्या 10 वर्षांतील 24 तासांमधील सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचा पाऊस असल्याची माहिती देण्यात आली आहे. केवळ मान्सूनचा निम्मा ऋतूमध्येच मुंबई उपनगरांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. यंदा मुंबईमध्ये सरासरीपेक्षा 24% अधिक पाऊस पडला आहे.

ANI Tweet 

मुंबईमध्ये यंदा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरूवात झाली मात्र काही ठराविक दिवस पावसाने दमदार बॅटींग केल्याने सध्या मुंबईमध्ये पाणीसाठा मुबलक आहे. मुंबईप्रमाणेच नाशिक,कोकण भागामध्ये पाऊस कोसळत आहे.