Mumbai Rain Updates: मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे डीवाय पाटील स्टेडियमचा बराचसा भाग कोसळला, Wankhede Stadium लाही बसला फटका (See Photo)
आज वादळी वाऱ्यासह मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे सीएसएमटी-वाशी दरम्यान तसेच सीएसएमटी-कुर्ला दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
गेले तीन दिवस मुंबई (Mumbai), ठाणेसह परिसरात मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरु आहे. आज वादळी वाऱ्यासह मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे सीएसएमटी-वाशी दरम्यान तसेच सीएसएमटी-कुर्ला दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. पावसाने झोडपल्यामुळे शहरातील अनेक इमारतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये नवी मुंबईमधील डीवाय पाटील स्टेडियम (DY Patil Stadium) तसेच दक्षिण मुंबई येथील वानखेडे स्टेडियमचाही समावेश आहे. पावसामुळे डीवाय पाटील स्टेडियमचा बराचसा भाग कोसळला आहे. या गोष्टीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.
काल पासून मुंबईमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे महालक्ष्मी रेसकोर्स, जेएनपीटी, भायखळा, दादर अशा अनेक परिसरांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. महत्वाचे म्हणजे डीवाय पाटील स्टेडियमचा बराचसा भाग कोसळला असून, वानखेडे स्टेडियमवरील दिवे पावसामुळे आणि वादळामुळे हलत आहेत.
पहा व्हिसीडी -
मुंबई आणि परिसरात वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस होत आहे. सर्वांनी घरी सुरक्षित थांबावे, कामासाठी बाहेर असलेल्या पत्रकारांनीही सुरक्षित ठिकाणी थांबावे, अशी विनंती पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तुफान पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची आणि पार्किंगमधील गाड्यांची पडझड झाली. मुंबईत अवघ्या 5 तासात 300 मिमी पावसाची नोंद झाली आहे. (हेही वाचा: मुंबईत मुसळधार पाऊस, महालक्ष्मी रेसकोर्स, जेएनपीटीसह अनेक ठिकाणी तुडुंब पाणी, रेल्वे ठप्प, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सीएसटी ते कुर्लादरम्यान पालिका शाळांमध्ये तात्पुरते निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. असुरक्षित भागातील रहिवाशांना या ठिकाणी हलवले जात आहे. यासह कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 100 क्रमांकावर संपर्क साधा, काळजी घ्या आणि सुरक्षित रहा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य )आणि परिस्थितीवर चर्चा करुन उपाययोजना करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे.