Coronavirus: रुग्णालयात क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुरेसे जेवण आणि सुविधा नसल्याचा दाव करत काढला पळ
मात्र रुग्णालयात त्यांना पुरेसे जेवण आणि सुविधा नसल्याने त्यांनी तेथून पळ काढला आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण झालेल्या नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांना सुद्धा काही दिवस होम क्वारंटाइनचा सल्ला दिला आहे. मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर दिवसरात्र उपचार केले जात आहेत. तर अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य कोरोनच्या दरम्यान उत्तमपणे पार पाडत आहे. मात्र एखाद्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने सुद्धा तो व्यक्ती ज्या जणांना भेटला आहे त्यांना ही क्वारंटाइन करण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर महापालिकेचे (BMC) दोन कर्मचारी एका रुग्णालयात क्वारंटाइन होते. मात्र रुग्णालयात त्यांना पुरेसे जेवण आणि सुविधा नसल्याने त्यांनी तेथून पळ काढला आहे.
मुंबई महापालिकेच्या दोन रुग्णांना कोरोनाचे संक्रमण झाल्याने त्यांना सिव्हिक रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र या कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात पुरेसे जेवण आणि सुविधांचा अभाव असल्याने म्हणत तेथून निघून गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र क्वारंटाइन करण्यात आलेल्या रुग्णांनी कोरोनावरील उपचाराचा कोर्स पूर्ण केल्याशिवाय घरी किंवा अन्य नागरिकांना भेटू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तरीही काही नागरिक हातावार क्वारंटाउइनचा शिक्का घेऊन बाहेर फिरताना पोलिसांकडून पकडण्यात आले आहेत. अशा रुग्णांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता अधिक असते.(Coronavirus: सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे COVID19 चा प्रसार वाढू शकतो असे नमूद करणारी सुचनावली ICMR यांच्याकडून जारी)
दरम्यान, महाराष्ट्रात 55 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 690 वर पोहचली आहे. आज मुंबईत 29, पुण्यात 17, पिंपरी-चिंचवड 4, अहमदनगर 3, औरंगाबादमध्ये 2 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच आतापर्यंत 56 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.