मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर आज आणि उद्या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

आज (29 जून) आणि उद्या (30 जून) मुंबई(Mumbai)-पुणे (Pune) रेल्वेमार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Railway | Image used for representational purpose | (Photo Credits: Facebook)

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वेवर सुद्धा झाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. तसेच आज (29 जून) आणि उद्या (30 जून) मुंबई(Mumbai)-पुणे  (Pune) रेल्वेमार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पावसामुळे मुंबई-पुणे मार्गावरील काही भागात दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे घटात दरड कोसळून दुर्घटना होण्यापूर्वी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर प्रगती, सिंहगड एक्सप्रेस, पुणे-पनवेल या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच या मार्गावरुन धावणाऱ्या काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.(मुंबई: पहिल्याच पावसात दादर येथे भिंत कोसळून 3 जखमी, गोरेगाव मध्ये विजेच्या धक्का लागून 3 जण मृत्यू)

गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. मात्र पावसामुळे रेल्वेगाड्यासंबंधित कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच काल जामरुंग रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन रुळावरुन घसरल्याने मुंबईकडून पुण्याच्या दिशेला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif