मार्च 2019 पर्यंत सुरु होणार मुंबई - पुणे Helicopter Taxi; इथे करू शकाल बुकिंग

मार्च 2019 मध्ये ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Horizon Hobby)

मुंबईहून पुण्याला अथवा पुण्याहून मुंबईला प्रवास करणाऱ्या लोकांच्या संख्येत हल्ली कमालीची वाढ झाली आहे. यासाठी एक्स्प्रेस वे तयार करण्यात आला, ओला – उबर सारख्या कंपन्यांनी या मार्गावर आपली जलद सेवा देण्यास सुरुवात केली. मात्र तरी वाहतुकीची कोंडी आणि त्यामुळे लागणारा वेळ यात काहीच फरक पडला नाही. आज या मार्गावर प्रवास करण्यासाठी कमीतकमी 4 तास लागतात. हीच समस्या ओळखून आता मुंबई आणि पुणे या मार्गावर हेलिकॉप्टर टॅक्सी (Helicopter Taxi)ची सुरुवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या तीन महिन्यात, म्हणजेच मार्च 2019 मध्ये ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.

अमेरिकेतील सर्वात मोठी हॅलिकॉप्टर सुविधा पुरवणारी फ्लाय ब्लेड (Fly Blade) या कंपनीने भारतातील हंच व्हेंचर्स (Hunch Ventures) या कंपनीसोबत टायअप करून ब्लेड इंडिया (Blade India) ही कंपनी सुरु केली आहे. मार्च 2019 पासून ही कंपनी भारतामधील हॅलिकॉप्टर टॅक्सीची सेवा सुरु करणार आहेत. ही सेवा मुंबई ते पुणे तसेच मुंबई ते शिर्डी या मार्गावरही सुरु होणार आहे. जुहू आणि महालक्ष्मी येथून ही हॅलिकॉप्टर उड्डाण घेतील. त्यानंतर अवघ्या 20 मिनिटांमध्ये हे हॅलिकॉप्टर पुणे किंवा शिर्डीमध्ये पोहचेल.

सध्या तरी ही हॅलिकॉप्टर्स फक्त विकेंडला उपलब्ध असणार आहेत. तुम्हालाही या सेवेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला ब्लेड इंडियाच्या अॅपवरुन ही हेलिकॉप्टर टॅक्सी बूक करावी लागेल. त्यासाठी किती दर आकाराला जाईल हे कंपनीने अजून जाहीर केले नाही. कंपनीच्या सध्याच्या दरांनुसार मुंबई ते पुणे या मार्गावर खाजगी जेट विमान 5 लाख 60 हजार रुपयांना भाड्याने उपलब्ध करुन देण्यात येते. मात्र या हेलिकॉप्टर टॅक्सीचे दर हे प्रवाशांना परवडतील असे असणार आहेत.

दरम्यान, बोस्टन कन्सल्टिंग (Boston Consulting) च्या एका हवालानुसार, भारतीय शहरे ही जगातील सर्वात गर्दीच्या शहरांपैकी एक आहेत. यात मुंबई, बंगळूरू, कोलकाता आणि दिल्ली यांचा समावेश होतो. या शहरांमधील ट्राफिक जाममुळे प्रवासाचा वेळ हा सरासरी 1.30 तास वाढलेला दिसून येतो. रस्त्यांवरील रहदारी, वाहतुकीच्या समस्या, ट्राफिक जाम यांमुळे वाढलेल्या प्रवासाच्या वेळेमुळे प्रत्येक वर्षी जवळजवळ $22 बिलीयन डॉलर इतके नुकसान होते. या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून हेलिकॉप्टर टॅक्सी ही अतिशय उत्तम पर्याय ठरेल यात शंका नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif